पावसाळ्यात घरात घोंगावणाऱ्या माशा दूर करण्याच्या सोप्या टिप्स

(Photo : Freepik)

Jun 24, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

पावसाळ्यात डास, माश्या, किटक यांचा त्रास वाढतो.

(Photo : Freepik)

यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यता असते. 

(Photo : Freepik)

त्रासदायक माश्यांपासून काही अंशी सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

(Photo : Freepik)

रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात.

(Photo : Freepik)

घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो.

(Photo : Freepik)

निलगिरीच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो हवाबंद डब्यात ठेवा.

(Photo : Freepik)

लिंबूचे दोन तुकडे करुन त्यात सहा ते सात लवंगा रोवा. लवंगाची चार कोन्यावाली बाजू वरच्या बाजूस असेल असे लिंबूमध्ये लवंगा रोवा.

(Photo : Freepik)

घरात जिथे जास्त माश्या दिसतील तिथे हा लिंबू ठेवून द्या. घरात माश्या येणार नाही.

(Photo : Freepik)

सुक्या पुदिन्याची पाने वाटून एका कापडात ते गुंडाळून त्याचे छोटे गाठोडे बनवून घरात ठेवावे.

(Photo : Freepik)

घरगुती उपायांसोबतच घर स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वच्छतेमुळे माश्यांचा, किटकांचा घरातील वावर कमी होतो.

(Photo : Freepik)

घरातील झाडांची पुरेशी काळजी घ्या. त्यांना अतिप्रमाणात पाणी घालू नका. सुकलेली पानं, कचरा वेळीच साफ करा.

(Photo : Freepik)

या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी