राम मंदिराला भेट देण्याचा विचार आहात का? अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेची लिस्ट एकदा पाहा
Jan 23, 2024
Loksatta Live
वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेससह देशभरातील अनेक ट्रेन अयोध्येला जातात.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आनंद विहार टर्मिनल ते अयोध्या कॅन्टोन्मेंटपर्यंत जाते.
वंदे भारत एक्सप्रेस ८ तास २० मिनिटांमध्ये ६२८ किमी धावते. एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे १५७० रुपये आणि २९१५ रुपये तिकट आहे.
याव्यतिरिक्त, अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन देखील दिल्ली-NCR ला अयोध्येला अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर सेंट्रल आणि लखनौ मार्गे जोडते.
पंजाब, त्रिपुरा आणि इतर राज्यांसह विविध ठिकाणांहूनही विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत.
भारतीय रेल्वे कमीत कमी स्टॉपसह ६६ ठिकाणांहून अयोध्येपर्यंत २०० विशेष 'आस्था ट्रेन' चालवण्याची शक्यता आहे.
२२ जानेवारीपासून आस्था ट्रेन सेवा १०० दिवसांसाठी वाढवण्याची शक्यता आहे.
त्रिपुरा येथील रहिवाशांसाठी ३१ जानेवारी, ३१ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारीला रेल्वेने अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी तीन विशेष गाड्या नियुक्त केल्या आहेत.
फेब्रुवारीमध्ये अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंजाबमधून चार विशेष गाड्या धावणार आहेत.