(Photo Credit: Instagram)

देशाचं राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी किती खर्च आला?

Feb 06, 2025

Loksatta Live

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

देशाचे राष्ट्रपती भवन त्याच्या भव्यतेसाठी ओळखले जाते. याठिकाणी लोक आपल्या कुटुंबासह अमृत उद्यानात फिरण्यासाठी येतात.

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

राष्ट्रपती भवनात एकूण ३४० खोल्या आहेत. शासनाची अधिकृत वेबसाईट म्हणते की राष्ट्रपती  भवनचा प्रवास करण्यासाठी किमान ३ तास वेळ लागतो.

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

सुमारे २३ हजार मजुरांनी राष्ट्रपती भवन तयार केले. हे २००,००० चौरस फूट पसरलेले आहे.

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

राष्ट्रपती भवन तयार करण्यासाठी त्याकाळी १.४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर बांधकामात ७० कोटी विटा वापरण्यात आल्या होत्या.

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

कॉरिडॉर, कोर्ट, गॅलरी, सलून, जिने याशिवाय दिल्लीमधील चार मजली राष्ट्रपती भवनात पॅन्ट्री आणि इस्त्रीसाठीही खोल्या आहेत.

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की, या इमारतीमध्ये स्वतःचे प्रिंटिंग प्रेस आणि थिएटर देखील आहे.

(Photo: Rashtrpatibhavan.gov.in)

राष्ट्रपती भवनाची अंतिम पायाभरणी व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते करण्यात आली होती तर ते १९२९ मध्ये पूर्ण झाले होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?