असा बनवा फक्कड टेस्टी चहा, जाणून घ्या खास टिप्स

May 13, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

चहा आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आपण चहापासून करतो.अनेक जण दिवसातून दोन तीन वेळा चहा घेतात. 

(Photo : Freepik)

असं म्हणतात की टपरीवरचा चहा अधिक स्वादिष्ट असतो पण तुम्ही सुद्धा घरच्या घरी स्वादिष्ट चहा बनवू शकता.काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही चहाचा स्वाद वाढवू शकता.

(Photo : Freepik)

साहित्य – पाणी, वेलची, आलं, लवंग, चहापत्ती, साखर, दूध, दालचिनी आणि वेलची पावडर

(Photo : Freepik)

सुरुवातीला एका भांड्यात गरम पाणी करा गरम पाण्यात बारीक वाटलेले आलं आणि वेलची आणि लवंग टाका.

(Photo : Freepik)

त्यानंतर हे सर्व कमी आचेवर त्यात उकळू द्या.त्यानंतर चहापत्ती आणि साखर टाका. चहा चांगला उकळू द्या

(Photo : Freepik)

त्यानंतर त्यात दूध टाका आणि चहाला चांगली उकळी येऊ द्या. तुमचा चहा तयार होणार. 

(Photo : Freepik)

वेलची, आलं आणि लवंग सुरुवातीला गरम पाण्यात उकळणे गरजेचे आहे. यामुळे चहाला चांगला स्वाद येतो.

(Photo : Freepik)

फ्रिजमधील थंड दूध फ्रिजमध्ये लगेच टाकू नका.थंड दुधामुळे चहाचा स्वाद बिघडू शकतो. 

(Photo : Freepik)

चहा बनल्यानंतर त्यावर वेलची पावडर आणि दालचिनी पावडर टाकल्यामुळे सुद्धा चहाचा स्वाद वाढतो.