घरी जास्वंद-मोगरा बहरून येण्यासाठी जुगाड

Nov 13, 2023

Loksatta Live

अजिबात वेगळा खर्च न करता आपण आज हटके गार्डन हॅक पाहणार आहोत

चहाची वापरून झालेली पावडर फेकून देण्याची चूक अजिबात करू नका.

चहा गाळल्यावर उकळलेली चहा पावडर गाळणीत उरते तीच तुम्हाला कुंडीत टाकायची आहे.

चहाच्या पावडरमध्ये पोटॅशियम असल्याने यामुळे हे एक नैसर्गिक खत म्हणून काम करते

रोपाला कळ्या यायला सुरुवात झाल्यावर तुम्ही कुंडीत सतत जास्त पाणी घालू नका

यामुळे मातीतील चांगले पोषक तत्व वाहून जाऊ शकते

माती अधून मधून वर खाली करा व मग त्यात ओलावा राहील एवढंच पाणी घाला.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोरा चहा डायबिटीज रुग्णांसाठी ठरू शकतो अमृत! पाहा ५ मोठे फायदे