(Photo: Gautami Patil/Instagram)
May 17, 2023
लावणी कलाकार गौतमी पाटील सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.
All Photos/ Gautami Patil -Instagram
गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील आणि वाद हे समीकरणच झालं आहे.
हल्ली माझ्या कार्यक्रमांवरुन बरेच वाद होत आहेत हे मी पाहते, असं गौतमीने सांगितलं.
मला सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणतात, हे लोक प्रेमापोटी म्हणतात. मात्र माझी त्यांना विनंती आहे की...
उगाच वाद घालू नका. कार्यक्रम पाहा, आणि शांतपणे घरी जा. कार्यक्रमात बायकाही येऊ लागल्या आहेत याचं समाधान वाटतं.
एवढंच नाही तर इतक्यात आपण लग्न करणार नाही असंही गौतमीने एका मुलाखतीत सांगितलंं आहे.
माझ्या कार्यक्रमाची, मानधनाची चर्चा होते तेव्हा बरं वाटतं. पण उगाच वाद नकोत असंही मला वाटतं.
राजकारणात जाणार का? विचारलं असता गौतमी म्हणते मुळीच नाही जाणार, मी माझे कार्यक्रमच करणार.
प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं त्याचं समाधान वाटतं असंही गौतमीने या मुलाखतीत सांगितलं आहे.
गौतमी सोशल मीडियावर सक्रिय आहे. तसंच तिच्याबाबत अनेक चर्चाही सुरु असतात.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा