ब्रेकअपनंतर २१ दिवस एकटे राहणे का गरजेचे?

(Photo: Unsplash)

Feb 02, 2024

Loksatta Live

ब्रेकअप म्हणजे दोन व्यक्तींमधील नाते संपुष्टात येणे होय. ब्रेकअपनंतरचा काळ हा खूप वेदनादायी असतो. ब्रेकअपनंतर फक्त नाते तुटत नाही; तर भावनासुद्धा दुखावतात. 

(Photo: Unsplash)

अशा वेळी काय करावं, कसं वागावं हे कळत नाही. मग फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे मूव्ह ऑन करणे म्हणजेच ब्रेकअपमधून बाहेर पडणे आणि स्वत:ला वेळ देणे; पण हे प्रत्येकाला सहज जमत नाही.

(Photo: Unsplash)

अनेक रिलेशनशिप एक्स्पर्ट सांगतात की, ब्रेकअपनंतरचे २१ दिवस खूप महत्त्वाचे असतात. २१ दिवस एकटे राहणे का गरजेचे आहे? चला तर जाणून घेऊ या.

(Photo: Unsplash)

ब्रेकअपनंतरच्या प्रत्येक दिवशी व्यक्तीच्या भावना बदलत असतात. असे मानले जाते की, संबंधित व्यक्ती तीन आठवड्यांत ब्रेकअप स्वीकारू शकतात; मात्र असे प्रत्येकाबरोबरच होईल, असे नाही. पण, २१ दिवसांत व्यक्तीचा मेंदू चांगल्या प्रकारे कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो.

(Photo: Unsplash)

ब्रेकअपनंतर माणसाच्या मनातील भावना वेगवेगळ्या रूपांत बाहेर पडतात.  अनेकदा मनावरील ताण (स्ट्रेस) वाढल्यामुळे मानसिक आरोग्य खालावते आणि व्यक्ती नैराश्यग्रस्त होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे भावनांना आवर घालणे गरजेचे आहे..

(Photo: Unsplash)

ब्रेकअपनंतर दु:ख हे होणारच, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे दु:ख समजून घ्या आणि व्यक्त व्हा. ब्रेकअपमधून बाहेर पडण्याची ही पहिली पायरी असते.

(Photo: Unsplash)

ब्रेकअपनंतर आत्मचिंतन करणे खूप जास्त गरजेचे आहे. ब्रेकअप कशामुळे झाले? तुमची काय चूक होती? समोरच्याची काय चूक होती? या बाबींचा विचार करा. 

(Photo: Unsplash)

ब्रेकअपनंतर स्वाभिमानाला धक्का बसतो. जर तुम्ही स्वत:ला वेळ न देता, ब्रेकअपनंतर लगेच नव्या व्यक्तीबरोबर नाते सुरू करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर ते नाते अपयशी ठरू शकते. त्यामुळे ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.

(Photo: Unsplash)