शंभर सीसी वा ११० सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटर प्रामुख्याने कम्युटिंग स्कूटर म्हणून ओळखल्या जातात. मायलेज हा स्कूटरचा केंद्रबिंदू असतो. तसेच, सीसी कमी असल्याने किंमतही तुलनेने कमी असते. मात्र, मोटरसायकलऐवजी स्कूटरचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना अशा ऑटोमॅटिक स्कूटर या कमी ताकदीच्या वाटू शकतात. त्यामुळेच विशेषत: पुरुष ग्राहकवर्ग डोळ्यापुढे ठेवून दुचाकी उत्पादक कंपन्यांनी १२५ सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटरचे उत्पादन लाँच केले आहे. यामध्ये पॉवर आणि मायलेज यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सेगमेंटमध्ये आकर्षक डिझाइन व फीचर्स अधिक असणाऱ्या स्कूटरचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, अशा स्कूटरच्या किमतीही अधिक आहेत. प्रामुख्याने १२५ सीसी पॉवरच्या ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये सुझुकी अॅक्सेस, होंडा अॅक्टिवा १२५ आणि व्हेस्पा १२५ या तीन स्कूटर आहेत, तर होंडाने नुकतीच मोटोस्कूटर डिझाइन इन्स्पायर्ड ग्राझिया ही ऑटोमॅटिक स्कूटर लाँच केली आहे. १२५ सीसीच्या स्कूटर सेगमेंटची सुरुवात सुझुकीने अॅक्सिस १२५ लाँच करून केली. अनेक वर्षे या स्कूटरला स्पर्धक स्कूटर नव्हती; पण गेल्या पाच ते आठ वर्षांत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातील प्रत्येक स्कूटरची खासियत वेगळी आहे; पण यातील बेस्ट कोण, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतोच. त्यामुळे याविषयी जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा