माझा रोजचा प्रवास साधारण ६० किमी आहे. तो शहरामध्ये अधिक आहे. सेकंड हँड टाटा झेस्ट एएमटी घेण्याचा माझा विचार आहे. ही गाडी कशी आहे? तिला किती मायलेज मिळेल? माहिती द्या.
– पुष्कर भावे
तुमचा प्रवास अधिक असल्याने तुम्ही डिझेल मारुती डिझायर व्हीडीआय ऑटोमॅटिक घ्यावी. शक्यतो सेकंड हँड गाडी घेऊ नये. जर आपले बजेट आणखी असेल तर नक्कीच फोक्सवॅगन अॅमिओ डीएसजी घ्यावी.
मला पेट्रोलची टिगोर, अॅक्सेंट, अॅस्पायर यांपैकी कोणती गाडी घ्यावी याबाबत पर्याय सुचवा.
–आशुतोष नांदेडकर
तुम्ही फोर्ड अॅस्पायर घ्यावी. त्यांची क्वालिटी उत्तम असून मेन्टेनन्सला अतिशय स्वस्त आणि सोपी अशी केलेली आहे. फोर्डने मेन्टेनन्स सव्र्हिसमध्ये खूप सुधारणा केली आहे.
मागील ३ वर्षांपासून मी मारुती ८०० वापरत आहे. आता मला नवीन टाटा टियागो एएमटी घ्यायची आहे. मी ही कार विकत घेऊ की इलेक्ट्रिक कार येण्याची वाट पाहू. येणाऱ्या काळामध्ये या परंपरागत कारचे भविष्य असेल का. कृपया मार्गदर्शन करा.
–महेंद्र चंदनशिवे
आता तुम्ही टाटा टियागो एएमटी घेऊ शकता. इलेक्ट्रिक कार येण्यासाठी अजून ७ वर्षे लागू शकतात. टियागो पेट्रोलला चांगली ताकद असून भक्कम इंजिन आहे. तसेच इंटेरिअरही उत्तम आहे.
माझे बजेट जवळपास ४ ते ५ लाख असून अॅटोमॅटिक गिअर कारचा पर्याय सुचवा.
–सदानंद गावित
तुम्हाला अल्टो के१० एएमटी गाडी घेणे उत्तम राहील. गाडीची ताकद आणि गिअर शिफ्ट उत्तम आहे आणि मेन्टेनन्सलाही ही सहज सोपी अशी गाडी आहे.
मला कुटुंबासाठी कार घ्यायची आहे. माझे बजेट जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत आहे. मला कमीत कमी मेन्टेनन्स खर्च असणारी, चांगली मायलेज देणारी आणि परवडणाऱ्या किमतीतील नवी कार सुचवावी. माझे रनिंग कमी आहे.
–अमीर अत्तार
तुम्ही थोडेसे बजेट वाढवून स्विफ्ट घ्यावी. क्वालिटीनुसार ती उत्तम आणि टिकाऊही आहे. अगदीच कमी बजेटमध्ये ुंदाई इऑन घ्यावी.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com