टीव्हीएस मोटर इंडिया या आघाडीच्या दुचाकीनिर्मिती कंपनीच्या नव्या झेस्ट ११० वरून हिमालय नजरेत साठविण्याचे आव्हान अभिनेत्री व रायडर अश्विनी पवार हिने सप्टेंबरमध्ये यशस्वीरीत्या पेलले. ११० सीसी गटातील तेही गिअरलेस स्कूटर प्रकारातील वाहन या माध्यमातून प्रथमच १८ हजार फूट उंचीवर पोहोचले. वयाच्या १६व्या वर्षांपासून बाईक चालविणाऱ्या अश्विनीने नियमित ३० ते ९० किलो मीटर वेगाने टीव्हीएस झेस्ट ११० चालविली. सलग १२ जणांच्या चमूसह १२ दिवस केलेल्या या अद्भुत प्रवासाचा अनुभव अश्विनीच्या शब्दात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगाच्या शिखरावर शोध घेण्यासाठी तुम्ही दररोज गलबतामध्ये प्रवेश करत नाही. दर दिवशी तुम्ही जगाच्या शिखरावर जाण्यासाठी स्कूटर चालवत नाही. त्यामुळे जेव्हा मला टीव्हीएस झेस्ट ११० वर हिमालय आणि जगातील सर्वोच्च वाहन चालवण्याजोगा मार्गावरून जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी खरंच जगाच्या शिखरावर पोहोचले होते!

एक कलाकार म्हणून मुंबईत असते तेव्हा मला बहुधा  माझ्या पात्रामध्ये राहण्याची गरज असते. कधी कधी कथा निर्माण करण्यासाठी वास्तविक भावना लपवाव्या लागतात. तरीही या राइडवर कोणतेही मुखवटे नव्हते! मला पुरातन भूप्रदेश, पर्वत, वाहते थंड पाणी, भव्य उंची आणि दूरस्थ मदानांमध्ये स्वतंत्र सोडले होते!

मी अस्वस्थतेसह माझ्या निर्णयाचा विचार करत होते. आम्ही दररोज किती मल प्रवास करू हे रस्ते आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असल्यामुळे ही अगदी सोपी राइड ठरणार नव्हती. पण मग पुन्हा आव्हानांशिवाय असलेले जीवन काय असते, विशेषत: जेव्हा आपण हिमालयाच्या शिखरापर्यंत स्वत:च्या स्कूटर्स चालवून सर्व नमुने मोडण्यास तयार असलेल्या १२ धाडसी व्यक्तींच्या लवाजम्यासह गाडी चालवण्याचा रोमांच अनुभवण्यास उत्सुक असतो.

स्मरणात राहील असा सुरू केलेला प्रवास माझ्यासाठी जीवन बदलवणारा अनुभव ठरला!

सप्टेंबरच्या सुरुवातीला आम्ही हिमाचल प्रदेशातील मंडीपासून प्रवास सुरू केला. आम्ही जगामधील अत्यंत आव्हानात्मक रस्त्यांवरून प्रवास करतो होतो ज्यांची उंची १८,००० फुटांपेक्षा जास्त होती. ११ दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही एकूण ९७० किलोमीटर अंतर पूर्ण केले. आम्ही बियास नदीच्या दगेबाज पाण्याला पार केले. सामान्य पर्यटक, गर्दीवर आणि ठप्प होणाऱ्या वाहतुकीवर मात केली. आपल्या टीव्हीएस झेस्ट ११०च्या चपळ स्वरूपामुळे हे शक्य झाले जिने सर्वोत्कृष्ट पॉवर, मजबूत कंपन नियंत्रण आणि चांगले सस्पेंशन पुरवते. डझनभर मोडलेले पूल, सफरचंदांच्या झाडांनी संरेखित माग आणि बर्फासारखे थंड भीतीदायक जलसाठय़ांनी समृद्ध सखोल सुंदर दऱ्यामधून प्रवास करताना आम्ही इन्स्टाग्रामसाठी सुयोग्य फोटो शूट्ससाठी अनेक जागी थांबलो. कातरवेळी आम्ही मनालीला पोहोचलो. जी रात्रीच्या मुक्कामासाठी आमचे पहिली छावणी होती. माझ्या काही सहप्रवाशांनी अगदी घाईघाईने नेहमीचे आणि सर्वव्यापी मॅगी नूडल्स आणि कपभर गरम चहा घेतला. आमच्यातील काहींनी ताजे, पारंपरिक आणि सेंद्रिय प्रकारे उत्पादित केलेले पर्वती जेवण घेण्याची निवड केली. यामध्ये मसालेदार दम-आलूसह गरम वाफवलेला भात वाढण्यात आला.

पुढच्या दिवशी सकाळी आम्ही आमचा प्रवास लवकर सुरू केला. आम्ही आमचा पहिला उच्चता असलेला पास-रोहतांग पासवर पोहचायच्या आधी सर्व चालकांसोबत लहानशी सभा केली. सूचना, क्लृप्त्या आणि टिपांची देवाणघेवाण केली. रोहतांगपर्यंत पोहचेपर्यंत आमचा अनपेक्षित आणि कठीण प्रवास, प्रवास वळणदार पर्वती रस्त्यांवरून संथपणे सुरू झाला. येथे अचानक हवामान बदलले आणि येथे आम्ही जोरदार आणि थंड वाऱ्यासह प्रचंड पावसाचा अनुभव घेतला. झेस्ट ११०, २ फूट खोल बर्फामधून जात होती आणि आपण प्रयत्न सोडून देऊ अशी सर्वाना चिंता वाटत होती. तरीही माझे सहचालक आणि झेस्ट ११०ने तो भाग बळकट करारीपणाने पूर्ण करून अपेक्षा पूर्ण केली. जवळपास शून्य दृश्यतेमधून प्रवास करून आम्ही टीव्हीएस झेस्ट ११०चे डीआरएल आणि शक्तिशाली हेडलॅम्पच्या मदतीने पुढे प्रवास केला. आम्ही केलाँगमधून आमची पुढची छावणी जिस्पा येथे पोहोचलो.

पुढच्या दिवशी नयनरम्य बारालाला पासवरून सार्चुपर्यंत अगदी आरामशीर प्रवास झाला. आम्ही थांबवण्यासाठी वळण घेतले आणि आम्ही भव्य भूभाग, बर्फाच्छादित पर्वत आणि निळ्या रंगाच्यी ताज्या पाण्याची सरोवरे असे निसर्गसौंदर्य पाहात होतो. सार्चुमधून, आम्ही मनमोहक पठारांमधून सुंदर पांग, त्स्कोकरमधून प्रवास केला आणि शेवटी हॅनली येथे पोहोचलो. येथे भारताची सर्वात उंच वेधशाळा स्थित आहे. पुढच्या दिवशी सकाळी, प्रवास सुरू करण्याआधी मला सुंदर जंगली गाढवे पाहायला मिळाली. त्यामुळे आम्ही पूर्वीच्या फसव्या प्रवासाचा विसर पडला. मस्त नास्ता केल्यानंतर आम्ही आमचे पुढचे गंतव्य – लेहला निघालो. हॅन्ली ते लेह हा आमचा २८० किलोमीटरचा सर्वात लांब प्रवास ठरला. हे अंतर पूर्ण करताना या अनुभवासोबत आमच्या गाडी चालवण्याच्या क्षमतेमध्ये किती सुधारणा झाली आहे हे आम्हाला समजले आणि आम्ही स्वत:ला कमी न लेखण्याचे व्रत घेतले. आम्ही पेपी टीव्हीएस झेस्ट ११०वर लेह गावामध्ये पोहोचत असताना सेनेच्या ट्रक्सचा ताफा, कठीण भागांचे मिश्रण, सरळ रस्ते, तीव्र वळण, मूनस्केप खडकनिर्मिती यांच्याशी झुंजावे लागले. आम्ही वर्दळ आलेल्या हिरव्या गावाच्या मध्यावर पोहोचलो. तेथे बौद्ध मठांमध्ये रंगीत प्रार्थनेचे झेंडे फडकत होते आणि तेथे ओम मणि पद्म्ो हुमेचे भजन ऐकू येत होते. येथेच माझ्या सहप्रवाशापैकी एकाने कठीण मार्गामधून गेल्यानंतर आपल्याला सुंदर गंतव्य मिळते, असा शेरा मारला. आम्ही आमचा अंतिम थांबा खारडुंगला पासपर्यंत पोहचायच्या आधी आम्ही रात्री थांबलो. त्यामुळे हा विचार कायमचा माझ्या मनात राहिला.

आम्ही खारडुंगलाला जाण्याआधी परिसर अनुकूल होण्यासाठी एक दिवस आराम करणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही बाजारामधील उबदार लहानशा हॉटेलमध्ये थांबलो आणि रात्रीच्या आरामाच्या आधी स्वादिष्ट लदाखी जेवणाची लज्जत घेण्यासाठी बाहेर पडलो.

पुढच्या दिवशी आम्ही आमच्या जीवनामधील सर्वोच्च, भीतीदायक आणि तरीही सर्वात आव्हानात्मक अशा खारडुंगला पासच्या प्रवासाला निघालो. लांब, वळणदार खडकाळ मार्ग, पूर्ण अडखळणारे खडक, घटत जाणारी ऑक्सिजनची पातळी आणि असभ्य उच्चता हे सर्व आमचे सामर्थ्य, शक्ती आणि कौशल्याची परीक्षा घेणार होते. अनेकदा चक्कर, ओकारी आणि भीतीचे क्षण आले. ज्या वेळी मला स्वत:बाबत शंका आली तेव्हा मी माझ्या कोपऱ्यातील कौशल्ये पणाला लावली. पुन्हा एकदा आमच्या या प्रवासातील दृश सहप्रवासी टीव्हीएस झेस्ट ११० ही सैनिक असल्याचे सिद्ध केले जिने नेहमी आमच्या प्रेरणा उच्च ठेवल्या. आम्ही आमच्या शेवटच्या रोड पोस्टवर वेलकम टु खारडुंगला, दि वर्ल्ड्स हाईएस्ट मोटरेबल रोड एट १८३८० फूट!

काहीही जाणण्याआधी आम्ही शिखरापर्यंत पोहोचलो! हिमालयाला काबीज करण्याची अनुभूती ही अगदी अनमोल असते. आणि त्यापेक्षाही उत्तम म्हणजे आम्ही स्कूटरवर भव्य हिमालयावर प्रवास करणे अशक्य आहे ही मान्यता भंग केली!

अश्विनी पवार

शब्दांकन  – वीरेंद्र तळेगावकर