येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या मदानावर गुरुवारपासून ऑटो एक्स्पो सुरू झाला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. २१ फेब्रुवारीपर्यंत हा ऑटो एक्स्पो सुरू राहणार आहे. सर्वसामान्यांमध्ये इंधन बचत, पर्यावरण संरक्षण, खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा अधिक वापर आदी विषयांवर या प्रदर्शनादरम्यान जनजागृती केली जाणार आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील प्रगती, वाहनांची स्वयंदेखभाल, वाहतुकीचे नियम, काळजीपूर्वक वाहन चालवणे, वाहन खरेदीसंबंधी कर्जव्यवस्था व विमा योजना इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशातील उत्पादकांचे प्रतिनिधी, विक्रेते, व्यापारी, सíव्हस इंजिनीअर्स, मेकॅनिक्स, गॅरेजमालक व संबंधित व्यावसायिक यानिमित्ताने एकत्र येणार आहेत.

Story img Loader