देशात सर्वाधिक मोटारसायकलची विक्री ही १०० ते ११० सीसी मोटारसायकल सेगमेंटमध्ये होते. या सेगमेंटमध्ये ४२ ते ५० हजार रुपयांपासून ते ५५ ते ६५ हजार रुपयांपर्यंत मोटारसायकल आहेत. मोटारसायकलच्या या सेगमेंटला कंपन्या वा उद्योग क्षेत्राच्या भाषेत मास मार्केट कम्युटर सेगमेंट मोटरसायकल, असे म्हटले जाते. हा सेगमेंट सर्वाधिक ग्राहकांचा असल्याने अधिकाधिक मायलेज, अधिकाधिक फीचर, स्टाइल, कम्फर्ट, कमी देखभाल खर्च आदी वैशिष्टय़े असणारी मोटारसायकल देताना किंमत कमी कशी ठेवता येईल, यावर दुचाकी उत्पादक कंपन्या भर देतात. त्यामुळेच काही कंपन्यांनी या सेगमेंटवर जास्त लक्षही केंद्रित केलेले नाही.
या मास मार्केट कम्युटिंग मोटरसायकल सेगमेंटमध्ये मोटारसायकलचे इंजिन हे १०० ते ११० सीसी क्षमतेचे आणि ८ ते ९ बीएचपीचे असते. अर्थात प्रत्येक मोटारसायकलचे डिझाइन, वजन, पॉवर-पिकअप वेगळा असल्याने मोटारसायकलचे मायलेज प्रति लिटर ७० ते ९० किमी अंतर जाते, असा दावा कंपन्यांकडून केला जातो. प्रत्यक्षात एवढे मायलेज मिळेल असे नाही. कारण मायलेजबाबत करण्यात आलेला दावा हा नियंत्रित परिस्थितीत घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या आधारे होतो. त्यामुळेच प्रति लिटर ५० ते ७० किमी असे मायलेज मिळते, असा अनुभव आहे. काहींना यापेक्षा अधिक मायलेज मिळू शकते. मास मार्केटमधील मोटारसायकलमधील कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांचाच अधिक लाभ मिळाला आहे. मोटारसायकलचे डिझाइन, फीचर यात गेल्या पंधरा वर्षांच्या तुलनेत कमालीचा फरक झालेला आहे. पूर्वी एंट्री लेव्हल मोटारसायकलमध्ये बटन स्टार्ट, हायड्रॉलिक सस्पेन्शन, अलॉय व्हील्स, डिस्कब्रेक (काही मॉडेलना), टय़ूबलेस टायर (काही मॉडेलना) डिजिटल अॅनॅलॉग मीटर आदी समाविष्ट झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचा एकप्रकारे लाभच झाला आहे. कम्युटर सेगमेंटची सुरुवात होते ती बजाज सीटी १००, बजाज प्लॅटिना, टीव्हीएस स्टार सिटी या मोटारसायकल येतात. मायलेज प्रति लिटर ९० किमीच्या पुढे मिळते, असा दावा या मोटारसायकलच्या बाबतीत केला जातो. सीटी १०० ही अगदी बेसिक मोटारसायकल आहे, असे म्हणायला हरकत नाही. मोटारसायकलला सिंगल सिलिंडरचे ८.१ बीएचपी असणारे १०० सीसीचे इंजिन बसविले आहे. बेसिक कम्युटरमध्ये अलॉय व्हीलचा पर्याय दिला जात नाही. मात्र, सीटी १०० अलॉय व्हील पर्यायाबरोबर इलेक्ट्रिक स्टार्टमध्ये उपलब्ध केली आहे. या मोटारसायकलची किंमतही चाळीस हजार रुपयांच्या (एक्स-शोरूम) आसपास आहे. मात्र डिझाइन, लूक्सबाबत टीव्हीएस स्टार सिटी ही या सेगमेंटमध्ये चांगली मोटारसायकल वाटते. या मोटारसायकलला ७.५ बीएचपी असणारे १०० सीसीचे इंजिन आहे. किक व स्पोक असणारे मॉडेल ३७ हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) आहे. कोणत्याही गीअरमध्ये बंद पडल्यावर सुरू होऊ शकते, हे वैशिष्टय़ आहे.
टीव्हीएस स्टार सिटीची किंमत वैशिष्टय़ांनुसार बदलते. यामध्ये अलॉय व्हील, बटन स्टार्टसारखे पर्याय दिले आहेत. बजाज प्लॅटिनाशी तुलना करता डिझाइन, लुक्सबाबत टीव्हीएस स्टार सिटी चांगली वाटत असली तरी या ठिकाणी प्लॅटिना भाव खाते. बजाज ऑटोने प्लॅटिनालाही ट्विन स्पार्क प्लगचे सिंगल सिलिंडरचे १०२ सीसीचे इंजिन बसविले आहे. या इंजिनची पॉवर ८.२ पीएस आहे. प्लॅटिना इलेक्ट्रिक स्टार्ट, अलॉय व्हीलसह उपलब्ध आहे. कंपनीने आता डे-टाइम एलईडी लाइट हे फीचर समाविष्ट केले आहे. त्यामुळे मोटारसायकलमध्ये एक प्रीमियम लूक आला आहे. पन्नास हजार रुपयांचे बजेट असणाऱ्यांना प्लॅटिनाचा पर्याय चांगला ठरू शकतो. पण, बजेट पन्नास हजार रुपयांच्या आसपास असणाऱ्यांना एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे स्प्लेंडर. गेली दोन दशके कम्युटर मोटारसायकलमध्ये स्प्लेंडर या मोटरसायकलची जादू होती. त्यामुळेच उत्तम तंत्रज्ञान, कमी देखभाल खर्च, उत्तम रिसेल मूल्य असे असणारी व्हॅल्यू फॉर मनी म्हणून स्प्लेंडर समजली जाते. मोटारसायकलला १०० सीसीचे ८.३६ पीएसचे इंजिन बसविले आहे. बटन स्टार्ट, अलॉय व्हील्स आदी फीचर यामध्ये समाविष्ट केली गेली आहेत. स्प्लेंडरचे प्लस व प्रो असे दोन मॉडेल पर्याय उपलब्ध आहेत. यातील प्रो हे मॉडेल अधिक आकर्षक, नव्या डिझाइनचे आहे. (पूर्वाध)
obhide@gmail.com