तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ठाम निर्णय घ्या.. कारण हीच योग्य वेळ आहे, गाडी घेण्याची. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक वाहननिर्मात्यांनी त्यांच्या गाडय़ांच्या खरेदीवर आकर्षक सवलती देऊ केल्या आहेत. मारुतीच्या अल्टोपासून ते महिंद्राच्या टीयूव्हीपर्यंत सर्वानीच ग्राहकाला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी २५ हजारापासून ते ५५ हजारापर्यंतची सूट देऊ केली आहे. तसेच इतर सवलतीही जोडीला आहेतच. आणि आता येऊ घातलेला सणासुदीचा हंगामही जोडीला आहे. त्यामुळे गाडी घेण्याची ही योग्य संधी आहे, ती दवडू नका..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उशिरा सुरुवात केलेल्या पावसाने मध्यंतरी जोर धरला. मध्ये पुन्हा उसंत. आणि आताही पावसाळा आहे, असं न वाटू देणारा मोसम. सुटीच्या दिवसातील पावसाळी सहल करण्याचा निरुत्साह तर यामुळे येतोच. शिवाय दुचाकी किंवा चारचाकीवर राइड करण्यातील अगतिकताही संपुष्टात येते.
रिमझिम पडणारा पाऊस आणि पाणी, चिखल उडवत जाणारी चाकं हे समीकरण जुळवून आणणं वाहनप्रेमींना कठीण होऊन बसलं आहे. अशा वेळी लाँग ड्राइव्ह तर दूरच अगदी पाच -पन्नास किलोमीटर परिसरातील पाऊस भ्रमंतीलाही मुकावं लागतंय.
अशा स्थितीतही वाहन उत्पादक कंपन्यांची सूट-सवलत सुरू आहे. यंदाचा पावसाळा पाहता त्यांच्याकडून निवडक वाहनांना मान्सूनच्या जोडीने काही हजार रुपयांचा अतिरिक्त लाभही देऊ करण्यात आला आहे. सुलभ अर्थसाहाय्य ते सुटे भाग, दुरुस्ती आणि प्रसंगी वाहनांच्या किमतीही काही प्रमाणात खाली आणल्या जात आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये वाहन उत्पादक कंपन्यांची विक्री तुलनेत सावरली आहे. एसयूव्हीला मिळालेल्या खरेदीदारांच्या प्रतिसादाच्या जोरावर तर प्रवासी वाहन विक्री जूनमध्ये सलग १२ महिन्यांत वाढली आहे. (केवळ कार विक्री मात्र त्या महिन्यात ५ टक्क्यांनी खाली आली.) ऑक्टोबर २०१५ पासून तर अनेक कंपन्या त्यांच्या अधिकतर नव्या उत्पादनावर भर देत आहेत. त्यासाठी कमी कालावधीत अनेक वाहने भारतीय वाहन बाजारपेठेत सादर केली जात आहेत.
तसं पाहिलं तर वाहन कंपन्यांसाठी सज्ज होण्याची वेळ म्हणजे दसरा-दिवाळीचा सण. या कालावधीत होणारी वाढती खरेदी लक्षात घेता कंपन्या नव्या उत्पादनाबरोबरच त्यांची व विद्यमान वाहनांची निर्मिती संख्याही वाढवीत असतात.
पुढील महिन्यात येणारी राखी पौर्णिमा व त्यानंतरच्या महिन्यातील गौरी-गणपती हेरून कंपन्यांनी यंदापासूनच घसघशीत सूट त्यांच्या वाहनांवर देऊ केली आहे. या सवलतींची तुलनाच करायची झाली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या अधिक प्रमाणात आहेत. अगदी १० हजार रुपयांपासून ते थेट दीड लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. शिवाय जोडीला सुटे भाग आदी आहेतच.
ह्युंदाईच्या इऑन ते इलेंत्रा-सॅन्टा फे या दरम्यानच्या विविध वाहनांवर १० हजार, ४० हजार रुपयांपासून सूट आहे. स्पर्धक मारुती सुझुकीने तिच्या अल्टोवर ३५ हजार रुपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे. कंपनीची ही सर्वात स्वस्त गटातील कार आहे. त्याचबरोबर सिआझसारख्या अधिक किमतीच्या (सेदान) कारवर ४५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभ आहेत. या सवलतीच्या रांगेत मात्र कंपनीने नव्या व्हिटारा ब्रेझा, एस क्रॉस यांना बसविलेले नाही.
अवजड वाहन श्रेणीत एकमेकांचे स्पर्धक असलेले महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व टाटा मोटर्स हेही या सूट – सवलतीच्या मोहापासून दूर राहू शकलेले नाहीत. उभय कंपन्यांना गेल्या काही महिन्यांत मिळत असलेल्या थंड विक्रीचा अनुभव येऊनही या कंपन्यांनी ३५ हजार, ६० हजार रुपयांपर्यंतची सूट त्यांच्या विविध गटांतील वाहनांकरिता देऊ केली आहे. महिंद्राची नवी टीयूव्ही३०० वर ५५ हजार रुपये तर केयूव्ही१०० वर २५ हजार रुपयांपर्यंत सवलत आहे. ५५ हजार रुपयांची घसघशीत सूट नव्या नुवोस्पोर्टलाही महिंद्राने दिली आहे.
टाटा मोटर्सच्या नॅनो, बोल्ट, इंडिका, सफारी, सुमो अशा सर्व गटांतील प्रवासी वाहनांकरिता ६० हजार रुपयांपर्यंत सवलत आहे. भारतीय वाहन व्यवसायातील नवखे खेळाडू निस्सान, फोर्ड, रेनो, फोक्सव्ॉगनसारख्या कंपन्याही त्यांच्या काही वाहनांसाठी सूट घेऊन आल्या आहेत.
जर्मन बनावटीच्या व आलिशान मोटार विक्रीत अव्वल असलेल्या मर्सिडिज बेंझने तर या मोसमात झिरो पर्सेट डाऊन पेमेंट सुविधा देऊ केली आहे. तीन वर्षांचे विमा छत्र, तीन वर्षांची देखभाल हेही जोडीला दिले आहेत. कंपनीच्या निवडक प्रीमियम सेदान श्रेणीतील वाहनांसाठी हे सारे लागू आहे.
वाहनप्रेमींचा प्रवासी ते एसयूव्ही व डिझेल ते पेट्रोल असा बदललेला कल लक्षात घेऊन यंदा कंपन्यांनी सूट – सवलतींची विशेष मांडणी केल्याचे आढळते. म्हणूनच गेल्या मान्सून मोसम तुलनेत यंदा दिली जाणारे लाभ हे ५ ते १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त आहेत.
हल्ली मॉलमध्येही दालनाबाहेरच – रस्त्यातच नवीन वाहने लाल रिबिनच्या वेष्टनात दिसतात. कंपन्यांच्या शोरूमच्या तुलनेत इथे वाहन जिज्ञासेला मिळणारा प्रतिसाद थंड असला तरी सध्या तिथेही मान्सून ऑफरच्या प्रसार छबी झळकत आहेत.
veerendra.talegaonkar@expressindia.com