आज आपण ज्या कारबद्दल बोलणार आहोत ती खरं तर ११ वर्षे जुनी आहे. आणि अजूनही ती देखणी आणि सर्वोत्तम कार म्हणून गणली जाते. तिचे तंत्रज्ञान आणि डिझाइनबाबतही ती अव्वलच. वाहन क्षेत्रात खूप विचारपूर्वक आणि सर्व ते देण्याचा प्रयत्न या कारमार्फत फळाला आला आहे.
मी बुगाट्टी व्हेरॉनबद्दल सांगतोय.
आजच्या वाहन क्षेत्रातील ही कार म्हणजे कोहिनूर हिराच म्हणायला हवं. २००५ मध्ये ही कार सर्वप्रथम सादर करण्यात आली. १००१ बीएचपी आणि १२५० एमएम टर्क असलेल्या या कारची किंमत १ दशलक्ष पौंड आहे. ती तयार करण्यासाठी दीड महिना लागला. या कारच्या एका टायरची किंमतच २०,००० पौंड म्हणजे भारतीय चलनात २० लाख रुपये आहे. बरं, तिच्या नियमित सव्‍‌र्हिससाठी तिला कंपनीच्या फ्रान्समधल्या मुख्यालयातच पाठवावं लागतं.
बुगाट्टी हा ब्रॅण्ड जर्मनीच्या फोक्सव्ॉगन समूहाचा आहे. २००० मध्ये समूहानं जाहीर केलं होतं की, १,००० बीएचपीची नवी कार ४०० किलो मीटर प्रति तासाने धावेल म्हणून. पण प्रत्यक्षात हे स्वप्न पुढील पाच वर्षांनंतर पूर्ण झालं.
जेव्हा वेगळ्या अशा निर्मितीवर काहीही मर्यादा नसतात तेव्हा अशा कार तयार होतात. ही कार म्हणजे ‘सिम्बॉल ऑफ एक्सलन्स’ आहे.
प्रत्यक्षात या कारला तेव्हा इतर वाहनांची स्पर्धा अशी नव्हतीच. वेग, तिगा प्रतिसाद, किंमत अशा धर्तीवर अन्य कुणीही तिच्या आसपासही नव्हतं. बरं १० कोटी अशी रगड किंमत म्हटल्यानंतर (अर्थात भारतीय चलनातच) कंपनीकरिता ती सोन्याची अंडी म्हणावी तर तसंही नव्हतं. तिच्या विक्रीतून कंपनीला काहीही नफा मिळत नव्हता.
कंपनीला तिची फिकीर नव्हतीच म्हणा. लक्षावधी डॉलर-पौंडाच्या किमतीतील वाहने बनवून गडगंज पैसा मिळविण्याचे ध्येय नव्हतेच कंपनीचे कधी. तर अशक्य कसे शक्य आहे हे समस्त जगाला दाखवून द्यायचे होते.
व्हेरॉनचा टॉप स्पीड ४०९ किलो मीटर प्रति तास हे या कारचं वैशिष्टय़ आपल्या डोक्यात घट्ट बसतं. हे कुणालाच शक्य न झाल्यानं ती आपोआपच गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जाऊन बसली.
प्राप्त केलेलं यश आणि क्षमता या जोरावर बुगाट्टी व्हेरॉन अप्लावधीत या क्षेत्रातील सुपरस्टार ठरली. ८.० लिटर डब्ल्यू१६ क्व्ॉड टबरे इंजिनाच्या जोरावर ही कार सर्वसाधारण कारच्या तुलनेत सुमारे १० पट भक्कम आहे. आता एवढी भक्कमता म्हणजे या कारमधील इंजिनही तापणारच की. मग तिला शांत करण्यासाठी दिमतीला १० रेडिएटर्स. (आपल्याकडे केवळ एकच.) अवघ्या २.५ सेकंदात ० ते १०० किलो मीटर ताशी वेग पकडण्याची या कारची क्षमता आणि अव्वल ४०० ते शून्य किलो मीटर प्रति तास येण्यासाठी तिला केवळ ९.८ सेकंद लागतात. बोइंग ७४७ जातीच्या विमानाचा वेग किती असतो माहितीय? २९० किलो मीटर प्रति तास. आणि व्हेरॉन +४०० केएमपीएच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

pranavsonone@gmail.com

 

pranavsonone@gmail.com