कृपया चांगल्या डिझेल कारबद्दल माहिती द्यावी. तसेच मॅन्युअल गिअर की अॅटोमॅटिक गिअर चांगले याबाबत मार्गदर्शन करावे.
– ईश्वर वंजारी
अॅटोमॅटिक गिअरमध्ये उत्तम डिझेल कार फोक्सवॅगन अॅमिओ डीएसजी अॅटोमॅटिक आहे. यामध्ये उत्तम डिझेल इंजिन आणि हाय एंण्ड गिअरबॉक्स आहे, जो पिकअप आणि मायलेज उत्तम देतो. मॅन्युअलमध्ये फोर्ड फिगो डिझेल घ्या.
सर, मला एक इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे. सध्या बाजारामध्ये कोणती कार उपलब्ध आहे आणि या कारची किंमत कितीपर्यंत असेल?
– अतुल अवचार, वाशिम
तुम्हाला महिंद्रा ई२० प्लस ही कार घेता येईल. ती ९ लाखांमध्ये उपलब्ध आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर १२० किमी चालते. जर वापर शहरामध्ये असेल तर ही कार उत्तम पर्याय ठरू शकते.
एसयूव्ही कारचे फायदे आणि तोटे सांगा.
– डॉ. अरुण पानझडे
फायदे : सोयीस्कररीत्या फिरता येते. अडीअडचणीला कामी येते, सामान नेण्यास सोईस्कर, वृद्ध माणसांना उत्तम. तोटे : नोकरी करणाऱ्यांना वाहतुकीची समस्या, सव्र्हिसिंगला देण्याची कटकट, खर्च खूप.
माझे महिन्याला ३०० किमी रनिंग असून, मी स्विफ्ट पेट्रोल आणि इग्निसमध्ये कन्फ्युज आहे. तुम्ही मला काही पर्याय सुचवू शकता का? मला इग्निसमध्ये स्विफ्टपेक्षा रिअर लेग रूम कमी वाटतो. कृपया मार्गदर्शन करा.
– रोशन वाकोडे
तुम्ही स्विफ्ट घ्यावी. ही आत्ताही उत्तम गाडी आहे आणि कायम राहील. तिची बिल्ड क्वॉलिटी नव्या स्विफ्ट डिझायरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. नवीन गाडय़ा हलक्या आहेत.
माझे बजेट ११ ते १२ लाख रुपये असून, मला चांगली डिझेल क्रॉसओव्हर घ्यायची आहे. होंडा डब्ल्यूआरव्ही कशी आहे याबाबत कृपया मार्गदर्शन करा.
– प्रवीण दाते.
तुम्ही डब्ल्यूआरव्ही घेत असाल तर पेट्रोल घ्यावी. अन्यथा फंदात पडू नये. डिझेल हवी असल्यास फोर्ड इकोस्पोर्ट किंवा टाटा नेक्सॉन घ्यावी.
रेनॉल्ड क्विड १.० कशी आहे याबाबत मार्गदर्शन करा. मी माझी पहिलीच गाडी घेत असून क्विड घेण्याचा विचार करत आहे. तुमचा टेस्ट ड्राइव्हदरम्यानचा अनुभव काय आहे?
– स्वप्निल बोरा
होय, क्विड १.० एल तुमचे पैसे वाचवते. गाडीचे १ हजार सीसीचे इंजिन अतिशय स्मूथ असून शक्तिशाली आहे. मात्र त्याच वेळी तुम्हाला मारुती इग्निसचे बेसिक मॉडेल ५ लाखांमध्ये उपलब्ध होऊ शकेल.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com