माझे बजेट ७ ते ८ लाख यादरम्यान आहे. यामध्ये ह्युंदाई आय२० आणि बलेनो यामध्ये कोणती कार घेणे योग्य राहील. (दोन्ही कार पेट्रोलमध्ये)
– मनोज लाड
तुमचा वापर हायवेवर असेल तर नक्कीच आय२० घ्यावी. ती दणकट असून स्टेबल आहे. शहरामध्ये वापर असेल तर बलेनो घेणे उत्तम. ती अॅव्हरेज छान देईल.
माझे बजेट ८ लाख असून, महिन्याचा प्रवास १ हजार किमी आहे. तो ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात उत्तम चालणारी कोणती कार मी घेऊ याबाबत कृपया मार्गदर्शन करा.
–स्वप्निल मंदाळे
तुम्ही मारुती ब्रेझ्झा किंवा महिंद्रा टीयूव्ही ३०० या दोन्ही गाडय़ांपैकी कोणतीही एक गाडी घेऊ शकता. या दोन्ही गाडय़ा तुम्हाला ८ ते ९ लाखात मिळतील. दोघांचे इंजिन अतिशय सायलेंट आणि उत्तम मायलेज देणारे आहे.
माझा रोजचा प्रवास ७० किमी आहे. मी टाटाची नॅनो कार घेऊ का? नॅनोचे सीएनजी व्हर्जन सध्या उपलब्ध आहे का? किंवा मी नॅनोला सीएनजीमध्ये करू शकतो का?
–भूषण शेलार
तुम्ही किमान मारुती अल्टो ८०० सीएनजी घेण्याचा पर्याय मी आपल्याला सुचवेन. ती पूर्ण टँक इंधन भरल्यानंतर किमान २५० किमी धावते. नॅनो सीएनजीची क्षमता कमी असून, तिचे इंजिन लवकर गरम होते.
मला कुटुंबासाठी कार घेण्याची इच्छा आहे. माझा मासिक प्रवास सरासरी ८०० किमी आहे. मी इनोव्हा क्रिस्टा, ऑटोमॅटिक व्हॅरिएंट पाहात आहे. इनोव्हा क्रिस्टाच्या अॅटो ट्रान्समिशनसाठी पेट्रोल किंवा डिझेल यापैकी कोणता पर्याय निवडावा. मार्गदर्शन करा.
–प्रनेश सानप
जर तुमचा प्रवास कमी असेल तर मी तुम्हाला फोर्ड इकोस्पोर्ट पेट्रोल अॅटोमॅटिक घेण्याचा सल्ला देईन. ही कार ड्राइव्ह करताना वेगळाच आनंद मिळतो. तसेच या कारचे इंजिनही शक्तिशाली आहे. जर तुम्हाला इनोव्हा क्रिस्टा घ्यायची आहे तर तुम्ही डिझेल व्हर्जन अॅटोमॅटिक घ्या. तिची ताकद आश्चर्यकारक आहे. तसेच तुमच्या पैशाचे योग्य मूल्य ही कार घेतल्यावर मिळेल.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com