माझ्याकडे डिझेल स्विफ्टचे २०११ चे मॉडेल आहे. नियमित वापर होत नाही. फक्त शनिवारी आणि रविवारी तिचा वापर करण्यात येतो. कार एका जागी थांबून असते. त्याची काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा.
–सुहास खाडे
तुम्ही गाडी दोन दिवसांनी एकदा तरी किमान पाच किमी फिरवली पाहिजेत. डिझेल हे इंजिनला चिकटून पिस्टन वैगेरे खराब करते. त्यामुळे ते चालने आवश्यक आहे. नाही तर कधी तरी ब्रेकडाऊन होऊन मेजर काम निघेल.
माझे बजेट ५.५० ते ६ लाख या दरम्यान आहे. माझा मासिक प्रवास ५०० किलोमीटर आहे. मला २०१८ मध्ये येणारी स्विफ्ट घेण्याची इच्छा आहे. ती मला किती रुपयांपर्यंत जाईल.
– विजय सावंत
तुम्हाला नवीन स्विफ्ट ६ ते ६.५० लाखांमध्ये मिळेल. तुम्ही साधारण व्हीएक्सआय घ्या. नवीन गाडीमध्ये तुम्हाला एबीएस आणि एअरबॅग्ज मिळतील. स्विफ्ट हे पैसे वसूल करणारे मॉडेल आहे.
मला नवीन लहान हॅचबॅक कार घेण्याची इच्छा आहे. माझा नियमित प्रवास १५ ते २० किमी आहे. दोन ते तीन महिन्यांतून एकदा बाहेरगावी १ हजार किमीपर्यंतचा प्रवास होतो. मला टाटा टियागो एक्सझेड मॉडेल घेण्याची इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन करा.
–सानम उंबरगीकर
तुम्ही टाटा टिआगो घ्यावी. त्यामध्ये तुम्हाला एक्सझेड हे मॉडेल घेतल्यावर अॅक्सेसरीजची आवश्यकता नाही. त्यामध्ये सगळं समाविष्ट आहे. गाडी भक्कम आणि आरामदायक आहे.
मला होंडा कंपनीची कार खरेदी करावयाची आहे. होंडा डब्ल्यूआरव्ही पेट्रोलबद्दल आपले काय मत आहे. या गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे. ही गाडी खरेदी करण्यास काही हरकत नाही ना.
– शेखर दांडेकर
गाडी चांगली आहे. यामधील फीचर्सही उत्तम आहेत. पण गाडी तीच्या तुलनेत खूप महाग (९ लाख) आहे. हेच सगळे फीचर्स तुम्हाला टाटा नेक्सॉनमध्ये ७ लाख रुपयांमध्ये मिळतील आणि ८ लाखांत तुम्हाला फोर्ड इकोस्पोर्ट पेट्रोल मिळेल.
मला एमपीव्ही प्रकारामध्ये गाडी हवी आहे आणि तिच्यामध्ये इनोव्हासारखे फीचर्स हवे आहेत. माझा नियमित प्रवास २० ते ३० किमी आहे. माझे बजेट १५ ते २० लाख रुपये आहे. कोणती कार घेऊ याबाबत मार्गदर्शन करा.
–चिंतामणी
या बजेटमध्ये तुम्हाला उत्तम अशी हय़ुंदाई क्रेटा अॅटोमॅटिक व्हर्जन मिळेल. अन्यथा जीप कंपासची निवड उत्तम ठरेल.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com