सर, मला दोन ते अडीच लाखांपर्यंत सेकंड हॅण्ड गाडी घ्यायची आहे. तर मी कोणती गाडी घ्यावी, याबाबत कृपया मला मार्गदर्शन करा.
– प्रदीप अहिरे
दोन लाखांपर्यंत आठ-नऊ वर्षे वापरलेली व्ॉगन आर किंवा आय१० घ्या. या गाडय़ा अधिक काळ चालतात आणि या गाडय़ांचे सुटे भागही सहज उपलब्ध असतात.
मी नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहे. माझे गाव बीड जिल्ह्य़ात असून नोकरीनिमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात असतो. त्यामुळे गावी जायचे असेल तर ७०० किमीचा पल्ला गाठावा लागेल. एरवी गाडी विनावापर राहील. कारण कार्यालय आणि घर यांच्यातील अंतर फारसे नाही. आम्ही कुटुंबात चौघे जण आहोत. बजेट सहा-साडेसहा लाख रुपये आहे. चांगला पर्याय सुचवा.
– रोहित पवार
तुम्ही स्विफ्ट डिझायर पेट्रोल गाडी घ्यावी. ही गाडी तुम्हाला सर्वतोपरी योग्य ठरेल. बीड आणि सिंधुदुर्ग येथे सव्र्हिस सेंटरही आहेत. आणि या गाडीचे इंजिन अतिशय सायलेंट आणि पॉवरफुल आहे. तुम्हाला दुसरा पर्याय हवा असेल तर फोक्सव्ॉगन अॅमियो पेट्रोल ही गाडी घ्या.
मला सेकंड हॅण्ड गाडी घ्यायची आहे. माझे रनिंग कमी आहे. पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेल. माझे बजेट तीन लाख रुपये आहे. कोणती गाडी घ्यावी, सुचवा.
– सूरज जामदार
तुम्ही सेकंड हॅण्ड होंडा ब्रिओ घ्यावी. या गाडीला उत्तम गुणवत्तेचे इंजिन आहे. जे जास्त काळ चालते. या गाडीला मेन्टेनन्सही कमी आहे. आणि पाच-सहा वर्षे वापरलेली गाडी तुम्हाला तीन लाखांपर्यंत मिळेल.
माझे बजेट पाच लाख रुपये आहे. मला माझ्या आईसाठी अॅटोमॅटिक गाडी घ्यायची आहे. मारुतीची के१० घेण्याचा माझा विचार आहे. तुम्ही अन्य कोणता पर्याय सुचवाल का.
– निखिल अभंगराव
गाडीचा बेसिक वापर असेल तर नक्कीच के१० एएमटी एकदमच दमदार निवड आहे. परंतु एक लाख रुपये जास्त असतील तर नक्कीच इग्निस एएमटी घ्यावी. त्यात एबीएस आणि एअरबॅग्ज आहेत.
मी चार वर्षांपासून इटिऑस लिवा ही गाडी वापरत आहे. आतापर्यंत गाडीचे फक्त ४५ हजार किमी रनिंग झाले आहे. चालविताना ती खूप खर्चीक ठरते. म्हणून मी त्यावर सीएनजी किट लावायचा विचार करीत आहे. त्यामुळे गाडीच्या कामगिरीवर परिणाम होईल का?
– प्रतीक पाटील
गाडीचा बूट स्पेस चांगला असल्याने सीएनजी चांगले ठरेल. टोयोटाची इंजिने सीएनजी फीटिंगसाठी सर्वोत्तम आहेत. त्यामुळे तुम्ही लोवाटो सिक्वेन्शियल किट लावा.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com