सध्या माझ्याकडे व्ॉगन आर व्हीएक्सआय हे मॉडेल आहे. परंतु एसी लावल्यावर गाडी थंड होत नाही. कुलंट वगैरे सर्व बदलून पाहिले. आठवडय़ाला किमान १०० किमी रनिंग आहे गाडीचे. आमचा नवीन गाडी घेण्याचा विचार आहे. कोणती गाडी घेणे योग्य ठरेल.
– ललित आफळे
व्ॉगन आरचा एसी उत्तम आहे. तुम्ही त्याचे एसी सव्र्हिसिंग करून घ्या. मारुतीच्या अधिकृत सव्र्हिस सेंटरमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने त्याची दुरुस्ती करून मिळेल. साधारणत: तीन हजार रुपये खर्च येईल. नवीन फोर्ड फिगोमध्ये एसी उत्तम आहे.
मी सहा जण आरामात बसू शकतील, अशी मोठी गाडी घेण्याचा विचार करत आहे. तर सीएनजी किंवा एलपीजी किट असलेली कोणती कार घ्यावी. अर्टिगा सीएनजी कशी आहे. परंतु अल्टोच्या अनुभवामुळे मारुतीची गाडी नकोशी वाटते. पर्याय सुचवा.
– राजेंद्र गडकरी.
एकतर मारुती अल्टो ८०० मुळातच कमी पॉवरची आहे. त्यात सीएनजी म्हणजे पॉवर कमी होणे. तुम्ही सीएनजी उपलब्ध असेल तर अर्टिगा सीएनजी घ्यावी. पॉवरमध्ये काही उणीव जाणवत नाही.
मला ह्य़ुंडाई एक्सेंटविषयी माहिती द्याल का.
– मुकुंद प्रधान
माझ्या मते ह्य़ुंडाई एक्सेंट ही कॉम्पॅक्ट सेडानमधील सर्वात लहान कार आहे. आणि ती महागडीही आहे. तुम्ही फोर्ड अस्पायर किंवा फोक्सव्ॉगन अॅमियो या गाडय़ांचा विचार करू शकता. त्या सर्वोत्तम कार आहेत.
मला मुंबई आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी वापरता येईल अशी सेकंड हॅण्ड गाडी हवी आहे. माझे बजेट तीन लाख रुपये आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– रुपेश शेळके
तुम्ही गाडी जास्त चालवणार असाल तर डिझेल सेकंड हॅण्ड स्विफ्ट डिझायर किंवा इटिऑस घ्यावी. या तुम्हाला सहा-सात र्वष जुन्या मिळतील.
मला फॉच्र्युनर गाडी घ्यायची आहे. माझे बजेट २० ते २५ लाख रुपये आहे. पेट्रोल वा डिझेल व्हर्जन घेऊ, याबद्दल मला कृपया मार्गदर्शन करा.
– आकाश पगारे
नवी फॉच्र्युनर तुम्हाला ३५ लाखांपर्यंत मिळेल. त्यापेक्षा तुम्ही इनोव्हा क्रिस्टा किंवा फोर्ड एण्डेव्हर घ्यावी. या दोन्ही गाडय़ा अगदी उत्तम आहेत आणि त्यांच्या किमतीही वाजवी आहेत.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com