मला नवीन कार घ्यायची आहे. या आधी ३ कार वापरल्या बजेट १० ते ११लाखांपर्यंत आहे. रोज १०० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. नौकरीसाठी या आधी मारुती ८००, मग इंडिका व सध्या अॅक्सेंट ६ वर्षे झाली. कोणती घ्यावी ते सांगा.
– स्मिता चितडे
रोज १०० किमीचा प्रवास तुम्ही स्वत: ड्राइव्ह करत असाल तर नक्कीच फोक्सवॅगन व्हेंटो डिझेल सेव्हन स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी घ्यावी. ही एक उत्तम आरामदायी स्टेबल अशी गाडी आहे आणि उत्तम क्वालिटीचा गीअरबॉक्स त्यात आहे.
मी मारुती बलेनो सीव्हीटी घेण्याचा विचार करत आहे. माझे रोजचे ड्रायिव्हग ७० किमी आहे. ही गाडी बऱ्यापकी पॉवरफुल आहे का? या गाडीबद्दल मला अधिक माहिती द्यावी.
– प्रसाद ओक
होय, मारुती बलेनो सीव्हीटी ट्रान्समिशन एक क्वालिटीचे ट्रान्समिशन आहे. त्यात तुम्हाला न अडखळता पॉवर हवी तेव्हा मिळू शकते. सीव्हीटी म्हणजे बेल्ट आणि कोन ड्राइव्ह त्यात व्हेरिएबल गीअरबॉक्स असतो. त्यामुळे झटपट स्पीड पकडता येतो.
माझ्याकडे सध्या मारुती ८०० ही कार आहे. मला मारुतीच्या नव्या इग्निसबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. माझे मासिक ड्रायिव्हग १०० किमी आहे. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. माझी उंचीही सहा फूट असून माझ्या घरात पाच सदस्य आहेत. कृपया मला मार्गदर्शन करा.
– एन. जी. जोशी
इग्निस ही एक उत्तम कार आहे. तिला १.२ लिटरचे इंजिन आहे जे स्मूद आणि पॉवरफूल आहे. तसेच मायलेजही चांगले देते. ही कार अतिशय स्टेबल आहे आणि शहर व हमरस्त्यावर चालवण्यास उत्तम आहे. वॅगन आरच्या तुलनेत ही सर्वोत्तम कार आहे. तुम्ही ऑटोमॅटिक व्हर्जन घ्या.
सर नमस्कार , माझ्याकडे नॅनो गाडी आहे, पण मला ती एक्स्चेंज देऊन देशी बनावटीची, दणकट व कमी मेंटेनन्स असलेली गाडी घ्यावयाची आहे; परंतु मारुतीची नको. माझे मासिक ड्रायिव्हग १०० किमी आहे. माझे बजेट साडेपाच ते सहा लाखांचे आहे. टाटा झेस्ट बद्दल आपले मत काय आहे? आणखी कोणती गाडी सुचवाल?
– अतुल कुलकर्णी, नाशिक
साडेपाच-सहा लाखांत तुम्हाला फोक्सवॅगन अॅमियो घेता येईल. ती दणकट आहे. ह्य़ुंदाईची ग्रॅण्ड आय१० ही गाडीही उत्तम ठरेल. टाटा टियागो हासुद्धा उत्तम पर्याय आहे. त्यातले टॉप मॉडेल तुम्ही घेऊ शकाल. झेस्ट साडेसहा-सात लाखांत आहे; परंतु पेट्रोलला मायलेज थोडे कमी आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com