* मला नोकरीच्या निमित्ताने दररोज किमान ४० किमीचा प्रवास करावा लागतो. मला टाटांची झेस्ट ही गाडी घेण्याची इच्छा आहे. मला गाडीचा रोज वापर करायचा आहे. ही गाडी घेणे कितपय योग्य आहे.
– गणेश महामुनी
* टाटा झेस्ट किंवा बोल्ट या गाडय़ा उत्तम आहेत. तुम्ही ती १२४८ सीसीची डिझेल व्हेरिएंट घ्या. तुम्हाला या गाडीचे बेसिक मॉडेल साडेसहा लाख रुपयांपर्यंत मिळेल. या गाडय़ा टाटांच्या आधीच्या गाडय़ांपेक्षा खूप स्टर्डी आणि उत्तम क्वालिटीच्या आहेत. मारुती, ह्य़ुंडाईपेक्षा या गाडय़ा उत्तम ठरत आहेत. या गाडय़ांचा मायलेज २४ किमी प्रतिलिटर एवढा आहे. या दोन्ही गाडय़ा खूप दणकटही आहेत.
* माझा रोजचा प्रवास असा खूप काही नाही. माझे गाव मुंबईपासून ८० किमीच्या अंतरावर आहे. मी दर एक-दीड महिन्यांनी गावी जातो. एरव्ही मला गाडीची गरज नाही. तरीही मला स्वस्त व फारशी त्रासदायक नसलेली गाडी घ्यायची आहे. जुनी कार घेण्याबद्दल आपले मत काय आहे.
– सुरेश देशमुख
’ तुम्हाला वॅगन आर सीएनजी ही गाडी योग्य ठरेल. तुम्ही ती नवीन किंवा सेकंड हँड घ्यावी. तुम्हाला खूपच कमी खर्च येईल.
* होंडा सिटी आणि ह्य़ुंडाई व्हर्ना यांच्यापैकी नेमकी कोणती गाडी घेऊ, याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. माझे बजेट १२ लाख रुपये आहे. दुसरा कोणता पर्याय असेल तर सांगा.
– सुजीत बोचरे
* पेट्रोल कार हवी असेल तर होंडा सिटी ही गाडीच घ्यावी. डिझेल कार हवी असेल तर फोक्सवॅगन व्हेंटो ही गाडी घ्यावी. तिचे टीडीआय इंजिन उत्कृष्ट आहे. व्हेंटो व सिटी या दोन्ही गाडय़ा चांगल्या आहेत.
* मला रेनॉ लॉजी किंवा टोयोटा इनोव्हा या दोन्हींपैकी एक गाडी घ्यावी. मी या दोन्ही गाडय़ांची परीक्षणे वाचली. त्यात तीन परीक्षणांनी लॉजीचा चांगले म्हटले आहे तर एकाने इनोव्हाला पसंती दिली आहे. काय करू सांगा.
– अरविंद चिंचवड
* लॉजीपेक्षा इनोव्हा ही जरा जास्त महाग आणि हेवी आहे. इनोव्हाचा मायलेज १३ किमी आहे तर लॉजीचा २० किमी प्रतिलिटर एवढा आहे. तुम्हाला मायलेजचाच विचार करायचा असेल तर लॉजी चांगली आहे. मात्र, तुम्हाला मायलेजबाबत काही अपेक्षा नसतील तर इनोव्हा ही केव्हाही चांगली गाडी आहे.
’ टोयोटा लिवा ही गाडी कशी आहे.
– सुहास विद्वांस
* टोयोटा लिवा ही एक उत्तम गाडी आहे. परंतु सध्याच्या गाडय़ा बघता तिची उंची कमी आहे. पेट्रोल व डिझेलमध्ये कार्यक्षमता सगळ्या कार्सपेक्षा उत्तम आहे. परंतु या गाडीचा आकार वेगळा असल्याने ती खपात मागे पडली आहे.
* माझे बजेट पाच लाख रुपये आहे. आम्ही घरात चार जण आहोत. मी प्रथमच गाडी घेणार आहे. टाटा झिकाबद्दल कृपया मार्गदर्शन करा. पेट्रोल घ्यावी की डिझेल, हेही सुचवा.
– सोहम सावंत, मुंबई
* टाटा झिका हे मॉडेल आता टियागो या नावाने लाँच झाले आहे. ही गाडी नक्कीच उत्तम दर्जाची आणि स्वस्त असेल. अवघ्या अल्टोच्या किमतीत तुम्हाला ११०० सीसीची गाडी मिळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा