* सर मला रिटझ् पेट्रोल कार घेण्याचे ठरवले आहे. तर रिटझ् घेतली तर चालेल का?
– स्वप्निल भोईर
* हो, रिट्झ या दिवसांत सर्वात किफायतशीर आणि उत्तम आरामदायी गाडी आहे. ती तुम्हाला वॅगन आरपेक्षा थोडे जास्त पसे देऊन मिळते.
* सर माझे बजेट ४.५ ते ५ लाख आहे. माझे महिन्याला २०० ते ३०० किलोमीटर ड्रायिव्हग आहे. वर्षांतून एक दोनदा गावी जाणे होईल. मी टाटा टियागो पेट्रोल एक्सटी ही गाडी बुक केली आहे. तरी कृपया मला कोणती गाडी घेऊ हे सुचवा.
– संदीप चौधरी
* तुमची निवड अगदी योग्य आहे. टियागो ही सध्याच्या प्रीमियम कारमधील सर्वोत्कृष्ट कार आहे.
* सध्या माझ्याकडे टाटा ई व्ही२ ही डिझेल इंडिका ही गाडी आहे. मला माझी गाडी बदलायची आहे. माझे मासिक ड्रायिव्हग किमान एक हजार किमी आहे. मला चांगले सस्पेन्शन असलेली गाडी सुचवा. आय २०, ह्य़ुंडाई अॅसेंट, फोर्ड फिगो यापकी कोणती चांगली ठरेल.
– शिरीष फाटक
* चांगल्या सस्पेन्शनसाठी ह्य़ुंडाई आय२० एलिट हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तसेच तुम्ही फोर्ड इकोस्पोर्टही चांगली गाडी आहे. तिचेही सस्पेन्शन खूप छान आहे.
* मला छोटी पॉवरफुल (१०००-१२००) हॅचबॅक गाडी घ्यायची आहे. माझे दिवसाचे रिनग १५-२० किमी असेल. कधी तरी गावाला नेता येईल अशी पण असावी. मला होंडा ब्रिओ स्पोर्टस् खूप आवडली. या गाडीबद्दल मार्गदर्शन करा किंवा पर्याय सुचवा. माझे बजेट ५-६ लाख आहे.
– रोहन वायळ, कल्याण.
* होय, ब्रायो ही लहान आणि चपळ गाडी आहे. तिची पॉवरही उत्तम आहे. तिचे इंजिन दीर्घकाळ टिकणारे आहे. तसेच मायलेजही चांगले आहे. तुम्ही शेवरोले बीटचीही ट्रायल घ्या.
* मी पहिल्यांदाच कार घेणार आहे. माझे बजेट साडेतीन ते चार लाख रुपयांचे आहे. रोजचा वापरही जास्त नसेल. महिन्यातून एकदा गावी जाणे होते. क्विड, आय १०, ईऑन यापकी कोणती गाडी घेऊ.
– सागर
* गाडीचा वापर जास्त नसल्यास तुम्ही मारुतीची अल्टो८०० या गाडीचा विचार करायला हरकत नाही. या गाडीचा मेन्टेनन्सही कमी आहे आणि किंमतही कमी आहे.
* मला मे २०२०ला कार घ्यायची आहे. आज ज्या कारची किंमत ४००००० पर्यंत आहे, तिची किंमत तेव्हा किती राहील? उदा. क्विड. आजच्या किंमतीत ती घेण्यासाठी काही तजवीज करून ठेवता येईल का?
-योगेश धोडरे, चंद्रपूर.
* असे काही करता येणार नाही. कदाचित क्विडपेक्षा अधिक चांगली गाडी तेव्हा तुम्हाला चार लाखांत मिळेल.