* नमस्कार, मला एसयूव्ही घेण्याची इच्छा आहे. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला मिहद्रा स्कॉर्पिओ खूप आवडते. तिचा लुक खूप छान आहे. तुम्ही मला याविषयी काही मार्गदर्शन करू शकाल का. माझा गाडीचा बहुतांश वापर पुण्यातच असेल. तसेच मला लाँग ड्राइव्हला जायलाही खूप आवडते. मला इंधनस्नेही, रफ आणि टफ तसेच कमी मेन्टेनन्स असणारी एसयूव्ही घेण्यात जास्त रुची आहे. कृपया सांगा.
– अनिरुद्ध देशपांडे, पुणे
* तुम्ही इंधनस्नेही एसयूव्हीच्या शोधात असाल तर तुम्ही एक तर मिहद्रा टीयूव्ही ३०० किंवा फोर्ट इकोस्पोर्ट घ्यावी. फोर्ड इकोस्पोर्टच्या नवीन डिझेल मॉडेलमध्ये १०० पीएस पॉवरचे इंजिन आहे. तसेच तिचा मायलेजही २२ किमी प्रतिलिटर आहे. तसेच केबिनही स्मूद आहे. तुम्ही इकोस्पोर्टच घ्यावी.
* मला आय२० एॅक्टिव्ह एसएक्स किंवा एलिट अॅस्टा १.२ अथवा मारुती बालेनो अल्फा मॉडेल यांपकी एक हॅचबॅक घ्यायची आहे. माझे बजेट आठ ते साडेआठ लाख रुपये आहे.
– प्रांज लोके
* तुम्हाला डिझेल कार घ्यायची असेल तर बालेनो ही तुमच्यासाठी उत्तम ठरेल. आय२० अॅक्टिव्ह ही खूप महाग आहे त्यामुळे ती घेताना दोनदा विचार करा. तसेच पेट्रोल व्हर्जनमध्ये मी तुम्हाला आय२० एलिट अॅस्टा ही गाडी सूचवेन. ती तुमच्या बजेटमध्ये येऊ शकते.
* समीरजी, मला मिहद्रा थार ही गाडी घेण्याची खूप इच्छा आहे. सध्या माझ्याकडे वॅगन आर ही गाडी असून माझे रोजचे ड्रायिव्हग ५० किमीचे आहे. कृपया मला थार या गाडीविषयी अधिक मार्गदर्शन करा.
मनीष सेवलीकर, पुणे
* तुम्ही थार ही गाडी घेण्याच्या विचारात असाल तर ती शहरी वापरासाठी अजिबात योग्य नाही. तसेच पुण्यात तुमचे रोजचे ड्रायिव्हग लक्षात घेता मी तुम्हाला थारऐवजी टीयूव्ही३०० ही गाडी घेण्याचा सल्ला देईल. थार हॉकचे इंजिन २१९७ सीसीचे असून ती खूप महागडी गाडी आहे.
* सर, माझे बजेट साडेचार लाख रुपये आहे. माझ्या कुटुंबात चार सदस्य आहेत. मला अल्टो८०० आणि क्विड या गाडय़ा घेण्याची इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– राहुल पोळ
* क्विड ही गाडी खूप स्टायलिश आणि आरामदायी गाडी आहे. तिचे मायलेजही खूप छान आहे. तुमचे महिन्याचे ड्रायिव्हग कमी असेल तर मग तुमच्यासाठी क्विड ही गाडी योग्य आहे. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये थोडी वाढ करू शकत असाल तर मिहद्राची केयूव्ही५०० ही गाडी घेण्याचा सल्ला मी देईल.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com
कोणती कार घेऊ?
मला एसयूव्ही घेण्याची इच्छा आहे. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला मिहद्रा स्कॉर्पिओ खूप आवडते.
First published on: 26-02-2016 at 02:11 IST
मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car buying tips