* मला नवीन गाडी घ्यायची आहे. सध्या माझ्याकडे एम८०० ही गाडी आहे. माझे दररोजचे ड्रायव्हिंग २२ किमी आहे. मला मध्यम आकाराची गाडी हवी आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

– जितेंद्र किंजवडेकर, पुणे</strong>

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

* अर्टिगाची किंमत आठ लाख रुपये आहे. ही गाडी तुम्हाला हवी असेल तर ठीक आहे. तुमच्या गरजांसाठी ही चांगली आहे. मात्र, तुमच्या एकंदर ड्रायव्हिंग गरजा पाहता तुमच्यासाठी होंडा जॅझ योग्य ठरेल. अर्टिगापेक्षा या गाडीचे आयुष्य, मायलेज चांगले आहे. तसेच वर्षांतून एक-दोनदाच तिला सव्‍‌र्हिसिंग लागते.

* चार ते साडेचार लाखांत योग्य अशी फॅमिली कार कोणती. फक्त घरगुती वापरासाठी गाडी हवी आहे. ह्य़ुंडाईच्या गाडय़ा कशा आहेत. कृपया सांगा.

– अनिकेत देसाई

* मारुतीच्या गाडय़ांपेक्षा ह्य़ुंडाईच्या गाडय़ा अधिक स्टर्डी आहेत. त्यांची कम्फर्ट लेव्हलही जास्त आहे. ईऑन ही गाडी चांगली आहे. परंतु ती दोन-तीन जणांसाठीच ठीक आहे. अन्यथा क्विड एक हजार सीसी ही गाडी चांगली आहे.

* माझे मासिक ड्रायव्हिंग तीन ते चार हजार किमी आहे. विशेषत: ग्रामीण भागात जास्त फिरणे होते. हॅचबॅक प्रकारातील कोणती गाडी माझ्यासाठी योग्य ठरेल. बजेट आठ ते नऊ लाख रुपये आहे. बलेनो, सिआझ किंवा इतर पर्याय सुचवा.

– सुनील गायकवाड

* तुमचे मासिक ड्रायव्हिंग ग्रामीण भागात जास्त होते. त्यामुळे तुम्हाला डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ाच जास्त योग्य ठरतील. तुमच्यासाठी मारुतीची ब्रेझा योग्य ठरेल. तिचा ग्राऊंड क्लीअरन्स चांगला आहे. मायलेजही चांगला आहे.

* मला नवीन कार घ्यायची आहे. स्विफ्ट आणि सेलेरिओ यांच्यात माझे कन्फ्युजन आहे. यापैकी मी कोणती गाडी घ्यावी असे तुम्हाला वाटते. मला लाँग ड्राइव्हला जाण्याची इच्छा आहे.

– अश्विनी खारकर

’ स्विफ्ट किंवा रिट्झ हे दोन उत्तम पर्याय सध्या मारुतीमध्ये उपलब्ध आहेत. मारुतीव्यतिरिक्त होंडा जॅझही दमदार आहे. तुमच्या बजेटप्रमाणे या तीन कारपैकी एकीची निवड करा.

* मला माझ्या कुटुंबासाठी कार घ्यायची आहे. आमचे बजेट पाच लाख रुपये आहे. आमचे मासिक ड्रायव्हिंग किमान एक हजार किमी असेल. आम्हाला क्विड, सेलेरिओ आणि टियागो यापैकी निवड करायची आहे. क्विड चांगली आहे परंतु तिचे इंजिन खूप आवाज करते. कृपया योग्य पर्याय सुचवा.

– अक्षय ओहोळ

* मी तुम्हाला मारुतीची रिट्झ एलएक्सआय ही गाडी सुचवेन. ही गाडी ऑनरोड साडेपाच लाखांपर्यंत मिळेल. खूप आरामदायी गाडी असून स्टर्डीही आहे. बजेट कमी असेल तर टियागो हाही उत्तम पर्याय आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com