* मी प्रथमच नवीन कार खरेदी करणार आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग २०० ते ३०० किमी असेल. मला हॅचबॅक पेट्रोल कार घ्यायची आहे. पाच ते सहा लाख रुपये बजेट आहे.
-कपिल रघुवंशी
* फोक्सवॅगन पोलो ही गाडी सहा लाखांत मिळू शकेल. तिचे ट्रेण्डलाइन मॉडेल आहे. हिचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी असून आतील जागाही कमी आहे. मायलेजही कमी आहे. मी तुम्हाला मारुती बलेनो ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. हॅचबॅक सेगमेंटमधील ही कार चांगली आहे. टाटा टियागो हाही एक उत्तम पर्याय आहे.
* मला माझ्या पत्नीसाठी कार घ्यायची असून तिला ऑटोमॅटिक कार हवी आहे. मला कृपया मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक कारमधील फरक सांगा. तसेच आमच्यासाठी कोणती ऑटोमॅटिक कार चांगली ठरेल याचे मार्गदर्शन करा. माझे बजेट दहा लाखांपर्यंत आहे.
– प्रदीप शेलार
* हल्लीच्या काळात ऑटो ट्रान्समिशन खूपच सुधारले आहे. त्यांचा परफॉर्मन्सही चांगला असून मायलेजही चांगला आहे. या गाडय़ांना मेन्टेनन्सही फारसा नसतो. त्यामुळे मी तुम्हाला बलेनो सीव्हीटी ऑटो ही गाडी सुचवेन. मात्र, तुम्हाला टॉप एन्ड मॉडेल पाहिजे असल्यास फोर्ड फिगो टिटॅनियम हा एक उत्तम पर्याय आहे. या गाडय़ा सात ते आठ लाखांत उपलब्ध आहेत. तुम्हाला सेडान कार हवी असल्यास
फोक्सवॅगन व्हेन्टो उपलब्ध आहे. हिची किंमत १२ लाख रुपये आहे.
* मला सात आसनी कार घ्यायची आहे. मारुती अर्टिगा कशी आहे.
– मोहन देवरे
* मारुती अर्टिगा जरा जास्त महाग आहे. तुम्ही त्याच किमतीत टीयूव्ही३०० ही गाडी घेऊ शकता. अन्यथा रेनॉ लॉजी ही गाडी घेण्याचा सल्ला देईन.
* सर, माझे बजेट पाच लाख रुपये आहे. मारुतीची सेलेरिओ घेण्याचा मी विचार करतो आहे. ही गाडी कशी आहे. तिचा परफॉर्मन्स कसा आहे, याविषयी कृपया सांगा.
– योगेश देशपांडे
* मारुतीची सेलेरिओ ही गाडी खूप छान आहे मात्र वजनाने हलकी आहे. १००च्या स्पीडला ती व्हायब्रेट होते. तिचे एक हजार सीसीचे इंजिनही त्यामुळे कमी ताकदवान भासू लागते. त्यामुळे तुम्हाला मी फोर्डची नवीन फिगो घेण्याचा किंवा मग टाटांची टियागो घेण्याचा सल्ला देईन. या दोन्ही गाडय़ा ताकदवान आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा