या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कार देखभाल आणि दुरुस्ती अनेकदा कारमालकाकरिता कटू अनुभव देणारे तसेच संतापजनक ठरतात. तुम्ही ज्या गॅरेजमध्ये अथवा सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये कार दुरुस्तीकरिता नेता तेथे तो तुम्हाला अतिरिक्त पैसे आकारतो असे तुम्हाला वाटते आणि याबाबत तुम्हाला कमी माहिती असल्याने बिल वाढत जाते. कारमध्ये काय नादुरुस्त आहे याबाबत आम्ही अनेकदा अजाणते असतो. तेव्हा मग अशा मॅकेनिकवर तुम्ही विश्वास व्यक्त करतात आणि तुमच्या खिशाला कमी भार पडेल, या भ्रमात तुम्ही असता. कार दुरुस्तीकरिता अथवा देखभालीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागू नयेत, असे प्रत्येकालाच वाटत असते.

काही आठवडय़ांपूर्वी मला वाहनामधील एसी दुरुस्त करावयाचा होता. कारमधील एसीमुळे केबिन त्वरित थंड होत नव्हती आणि ब्लोव्हर स्पीडही कमी होता. शहरातील प्रसिद्ध एसी दुरुस्त करणाऱ्या दुकानात मी गेलो. तिथे आधीच या समस्या निवारण्याकरिता वाहनांची गर्दी झाली होती. तेव्हा वेळेबरोबरच किती खर्च येईल, अशी साधी विचारणा मी केली. शेवटी दुसऱ्या दिवशी ठरवून जायचे मी निश्चित केले. एसी ब्लोव्हर स्वच्छ करून नव्या रेफ्रिजरंट गॅससह अंतर्गत रचनाही बसविली जाईल, असे त्याने सांगितले. यासाठीचा खर्च २,६०० रुपये सांगितला गेला. एसीमधील कूलिंग गॅसमध्ये गळती होत असावी, असा त्याचा संशय. तेव्हा तो नव्याने भरून नेमकी कुठे गळती होते ते तपासावे लागेल, असे समर्थन त्याने केले.

कोणतीही तपासणी न करता त्याने निदान केले होते. याबद्दल मी अर्थातच समाधानी नव्हतो. मी मग सरळ स्थानिकच एका अन्य कार दुरुस्ती दुकानात गेलो. त्याला सांगितले, कार सुरू करून बघ अन् काय समस्या आहे ते सांग. त्याने अर्थातच ग्लोव्ह बॉक्सजवळचा एसी एअर फिल्टर बघितला. हा फिल्टर पूर्णत: धुळीने माखला होता आणि त्याचा मूळ पांढरा रंग गडद करडा दिसत होता. तो काढून त्याने मग त्याला पाण्याने धुतले. काही मिनिटांतच त्याला कोरडा केला. पुन्हा तो त्याच्या पूर्वीच्या जागी लावला. कार सुरू केली आणि काही मिनिटांतच एसी गारवा देऊ लागला. अवघ्या अध्र्या तासाच्या आत अख्खी कार थंड झाली. माझी समस्या सुटली होती. तीदेखील अवघ्या १०० रुपयांमध्ये!

अगदी कमी प्रकरणात कारच्या एसीची वायू गळती होते, अशी माहिती या मॅकेनिकने मला दिली. म्हणूनच याद्वारे अनेक जण कारचालकांकडून सहज पैसा काढतात. प्रत्यक्षात लागणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक रकमेची मागणी अशा प्रकारे केवळ आपल्याला माहिती नसते म्हणून केली जाते आणि आपण त्याला बळी पडतो. तेव्हा कारबाबत, त्यातील सुटय़ा भागाबाबत, त्याच्या कार्यपद्धतीबाबत थोडी माहिती असणे आवश्यकच आहे. अनावश्यक खर्चापासून बचावाकरिता ते खूप महत्त्वाचे आहे.

pranavsonone@gmail.com