मला प्रथमच गाडी घ्यायची आहे. डोंगराळ, ग्रामीण भागात व वेळेप्रसंगी शेतीचे सामान नेता येईल अशी गाडी सुचवा. गाडी किफायतशीर असावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रघुनाथ आपटे, चाकण

तुमचे बजेट जर कमी असेल तर तुम्ही टीयूव्ही ३०० घ्यावी. अन्यथा आयएसयूझेडयू डीमॅक्स ही १० लाख रुपये किमतीची गाडी उत्तम ठरेल. तिचा ग्राऊंड क्लीअरन्स उत्तम आहे. पॉवरही अधिक असून, त्यात तुम्हाला फोरव्हील ड्राइव्हचा अनुभव मिळेल.

मला नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट ७ लाखापर्यंत आहे. स्विफ्ट डिझायर की बलेनो डेल्टा उत्तम राहील. पेट्रोल की डिझेल कार घेऊ हा पर्याय सुचवा. मासिक प्रवास ६०० ते ८०० किमी आहे.

शरद थांगे

तुम्ही बलेनो डेल्टा पेट्रोल घ्यावी. तिच्यामध्ये डिझायरपेक्षा जास्त जागा आहे. आणि फीचरच्या दृष्टीनेही ती अधिक उत्तम आहे. बाकी इतर सर्व गोष्टी सारख्या आहेत. शेवटी तुम्हाला गाडीचा शेप कसा आवडेल त्यावर सर्व काही अवलंबून आहे.

मी डॉक्टर असून, माझा नियमित प्रवास ५० ते ६० किमी आहे. कमी बजेटमध्ये मी नवीन किंवा जुन्यामध्ये कोणती कार घ्यावी

अमोल कंभार

तुमच्या कमी बजेटमध्ये तुम्ही टाटा टिआगो डिझेल ही नवी कार घेऊ शकता. ती तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जर तुम्ही शहरी वाहतुकीमध्ये प्रवास करीत असाल तर मारुती इग्निस डिझेल ऑटोमॅटिक ही कार सात लाख रुपयांमध्ये घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com