* मी मारुती सुझुकीची इग्निस ही गाडी घेण्याचा विचार करत आहे. ऑटोमॅटिक घेऊ की मॅन्युअल ट्रान्समिशन याबद्दल मार्गदर्शन करावे. दोन्हीचे फायदे-तोटेही सांगावे.
– सुनील राऊत
* इग्निस गाडी उत्तम आहे. तिचे ऑटोमॅटिक मॉडेल तुम्ही घ्यावे. मारुतीची सेलेरिओ ही गाडीही ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये यशस्वी ठरली आहे. इग्निसमध्ये १.२ लिटर क्षमतेचे इंजिन असल्याने ही गाडी अतिशय सायलेंट आणि पॉवरफूल आहे.
* माझे वार्षिक ड्रायव्हिंग २५ हजार किमी आहे. मी स्विफ्ट आठ वर्षे वापरली. माझे बजेट ११ लाखांचे आहे. चौकोनी कुटुंबासाठी ब्रेझ्झा, क्रेटा, इकोस्पोर्ट यांपैकी कोणती गाडी उपयुक्त ठरेल.
– जगदीश आपटे
* तुमचे ड्रायव्हिंग हमरस्त्यांवर जास्त असेल तर तुम्ही मारुती सुझुकी सिआझ घ्यावी. त्यात डिझेल मॉडेलमध्ये एसएचव्हीएस तंत्रज्ञानामुळे सर्वोत्तम मायलेज मिळते. अन्यथा अधिक सुरक्षेसाठी फोक्सव्ॉगन व्हेंटो टीडीआय घ्यावी.
* माझे बजेट सहा लाख रुपये आहे. मला शेवरोले सेल गाडी घ्यायची आहे. स्पेशियस आणि कमी मेन्टेनन्स असणारी मारुतीची एखादी गाडी आहे का, सुचवावे.
– सुहास आंबुलगेकर, पुणे</strong>
* कमी मेन्टेनन्स असणारी चांगली कार हवी असेल तर मी तुम्हाला फोर्ड फिगो ही गाडी सुचवेन. ते शेवरोलेप्रमाणेच लिमिटेड मेन्टेनन्सची हमी देतात.
* मला गाडी घ्यायची असून माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० ते ४०० किमी आहे. मी नवीन गाडी घ्यावी की सेकंड हँड. नवीनमध्ये मी सेलेरिओ व्हीएक्सआय किंवा स्विफ्ट यांच्या पर्यायाचा विचार करतो आहे. मी सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार केला तर मला काय पर्याय आहेत.
– योगेश झुंजारराव, डोंबिवली
* तुमचे ड्रायव्हिंग कमी असेल तर मी तुम्हाला नवीन कार घेण्याचा सल्ला देईन. चांगला मायलेज आणि कमी मेन्टेनन्स अशी गुणवैशिष्टय़े असलेली कार म्हणजे मारुती सेलेरिओ. परंतु ह्य़ुंडाई ईऑन ही गाडी सुरक्षा आणि गुणवत्तेच्या तुलनेत अधिक चांगली आहे.
* आम्हाला कार घ्यायची आहे. आमचे बहुतेक ड्रायव्हिंग शहरातच असेल. गाडीचा मासिक वापर ७०० ते ७५० किमी असेल. इटिऑस लिवा किंवा ग्रँड आय१० यांचा विचार आम्ही करत आहोत. आम्हाला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. बजेट सहा ते सात लाख रुपये आहे.
– वृषाली कुलकर्णी
* तुमचा गाडीचा वापर शहरातच जास्त असेल तर मी तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी घेण्याचा सल्ला देईन. तुमच्या बजेटप्रमाणे मारुती इग्निस आणि निसान मायक्रा सीव्हीटी या दोन गाडय़ांपैकी एकीची निवड करण्याचे मी तुम्हाला सुचवेन.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com