* माझे बजेट सात ते १४ लाख रुपये आहे. मला सात आसनी एसयूव्ही घ्यायची आहे. मला एमपीव्ही किंवा इनोव्हा क्रिस्टा यापैकी काहीही नको आहे. तरी मला योग्य गाडी सुचवा. माझा हायवेवरचा मासिक प्रवास किमान १५०० किमी आहे. मला टाटा हेक्झा आवडली. कृपया मला या गाडीविषयी अधिक माहिती द्या.

– उमेश सासणे

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

* सात आसनी एसयूव्हींमध्ये खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. हेक्झा ही उत्तम गाडी आहे परंतु तिची किंमत खूप आहे. मी तुम्हाला ह्य़ुंडाई क्रेटा डिझेल ऑटोमॅटिक मॉडेल घेण्याचा सल्ला देईन.

* दारात असावी म्हणून कार घ्यायची आहे. महिन्या १०० ते २०० किमी प्रवास होईल. गाडी अधिक करून ग्रामीण भागात जास्त चालवायची आहे. कमीत कमी किमतीत कोणती गाडी घेऊ.

– प्रथमेश देशपांडे, सिरसाळा

* तुम्ही अल्टो ८०० ची स्टॅण्डर्ड मॉडेल घ्या. या गाडीला कमी मेन्टेनन्स आहे. मायलेज चांगले आहे आणि सर्वात कमी सव्‍‌र्हिस कॉस्ट आहे. ही गाडी तुम्हाला तीन लाखांत मिळेल.

* माझी उंची सहा फूट तीन इंच आहे. मला सात लाखांपर्यंत एखादी चांगली गाडी सुचवा. माझे मासिक ड्रायव्हिंग १००० किमी असेल.

– गोपी राऊत

* तुमच्या उंचीसाठी केयूव्ही१०० ही गाडी योग्य आहे. ही गाडी स्पेशियस आहे तसेच गाडीची किंमतही फार नाही. तुम्ही या गाडीचे टॉप एण्ड पेट्रोल मॉडेल सात लाखांपर्यंत घेऊ शकता. पुढील पर्याय टाटा झेस्ट आहे. ती एक स्पेशियस सेडान कार आहे.

* माझे बजेट आठ ते १२ लाख रुपये आहे. आम्ही होंडा बीआर व्ही घेण्याचा विचार करीत आहोत. तुम्ही काय सुचवाल, ही गाडी योग्य आहे की नाही.

– पंकज चोतपगार, अमरावती</strong>

* होय, होडा बीआर व्ही ही एक लक्झरी कार आहे. मात्र, तुम्हाला स्पेशियस आणि सात-आठ जणांसाठी गाडी हवी असेल तर तुम्ही रेनॉ लॉजी ही गाडी घ्यावी. ही गाडी सर्वोत्तम तर आहेच शिवाय मेन्टेनन्सही कमी आहे.

* पाच ते सहा लाखांत येणारी, कमी मेन्टेनन्स असणारी कार सुचवा. माझे मासिक ड्रायव्हिंग किमान १०० किमी असेल आणि वर्षांतून एक-दोनदा लाँग ड्राइव्हला जाणे होईल. गाडी सुचवा.

– संतोष जोगदंडे

* तुमचे ड्रायव्हिंग कमी असेल तर मारुती इग्निस घ्यावी. यात तुम्ही अ‍ॅटोमॅटिक गिअरबॉक्स मॉडेल घेऊ शकता. दोन्ही मॉडेल्स उत्तम आहेत. मारुतीच्या इतर गाडय़ांपेक्षा इग्निस दणकट आणि पॉवरफूल आहे. गाडीचे इंजिन १२०० सीसीचे आहे.