आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला तुमची नवी कार खरेदी करण्यास मार्गदर्शक ठरतील. यामुळे वाहन खरेदीतला एक उत्तम आर्थिक व्यवहार तुम्ही पार पाडू शकाल आणि कार विक्रेताही तुम्हाला फसवू शकणार नाही.
सर्वसाधारणपणे कारचे निर्मित आयुष्य ६ -७ वष्रे असते. अनेक वाहनांबाबत कंपन्या ते १० वर्षांपर्यंतही वाढवतात. प्रत्येक ३ वर्षांनंतर कंपन्या त्यांच्या उत्पादनात किरकोळ बदल करत असतात. स्पध्रेत टिकून राहण्यासाठी तसेच काही अतिरिक्त सुविधा पुरविण्यासाठी, वाहनाच्या अधिक आकर्षतेिकरिता हा सारा खटाटोप असतो.
९० टक्क्यांपर्यंत वाहनांच्या इंजिनात फार बदल केला जात नाही. कारण त्यासाठीचा खर्च अधिक असतो. इंधनक्षमता वाढविण्यासाठी काही पावले उचलली जातात. जसे दशकापूर्वी सादर झालेल्या स्विफ्टमध्ये असलेले १.३ डीडीआयएस इंजिन हे या कारच्या पुढल्या दोन आवृत्त्यांतही नाममात्र बदलासह कायम ठेवण्यात आले. सांगण्याचा मुद्दा हाच की कंपन्या त्यांचे एखादे वाहन नव्याने सादर करतात तेव्हा त्यात तांत्रिक बदल खूपच कमी असतो. त्याच्या केवळ बा’ारूप, अंतरंगात बदल केला असतो.
नवीन आव्रुत्ती येते तेव्हा विक्रेत्यांनाही जुनी वाहने विकण्याची घाई असते. कारण त्यांना मागणी कमी होणार असते. नवं काही येणार हे ते कधीच सांगत नाहीत. कारण त्यांची बांधिलकी कंपनीशी अधिक व ग्राहकांशी कमी असते. तुम्ही हीच संधी हेरायला हवी. विक्रेते अशा वेळी तुम्हाला ५०,००० पासून १,००,००० रुपयांपर्यंत सूट देतात. आणि हीच तुमची बचत ठरते.
यासाठी तुम्ही थोडं अलर्ट राहणंही गरजेचं आहे. सध्याचं मॉडेल कधी बंद होणार आहे, त्यात नवीन काही येणार का, तर ते कधी, जुन्यातलं नावीन्य खरंच आकर्षक, अधिक सुविधा देणारं आहे का याबाबत अपडेट राहायला हवं.
pranavsonone@gmail.com