रस्त्यावर धावणाऱ्या सर्व गाडय़ा या सीओ२ वायू उत्सर्जित करतात. गाडीतील इंजिन हे ऊर्जा निर्माण करतं आणि त्यामुळे वाहनाला गती प्राप्त होते. पण त्याच वेळी अनेक वायूही वाहनातून बाहेर पडतात. वाहनातून बाहेर पडणारी ऊर्जा ही प्रति किलोमीटर गॅ्रममध्ये मोजली जाते.
कल्पना करा की, वाहनातून धोकादायक धूर बाहेर पडणाऱ्या पाइपमधून जर पाणी येऊ लागले तर? ही कल्पना नक्कीच वाटू शकेल. पण विज्ञानाने ते सिद्ध केलंय. वायू एक्झॉस्ट असलेल्या वाहनाच्या एक्सिलेटरमधून पाणी येणाऱ्या काही कार आहेत. हेच हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते.
विशेषत: ही याबाबतची यंत्रणा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरली जाते. त्यासाठी वाहनात स्वतंत्र फ्युएल सेल्स असतात. त्याला फ्युएल सेल स्टॅकही म्हणतात. वाहनाच्या इंजिनासाठी लागणारी आवश्यक तेवढीच ऊर्जा याद्वारे प्रदान केली जाते. त्याचबरोबर इंधन दीर्घकाळ पुरेल, अशी व्यवस्था त्यात असते. इंधनाद्वारे तेवढी ऊर्जा निर्माण केली जाते आणि वाहनालाही तेवढेच बळ मिळते.
फ्युएल सेलच्या अ‍ॅनोड बाजूने हायड्रोजन तयार होतो. तो कॅथोड बाजूला येतो. कॅथोड बाजूने प्रोटोन आणि इलेक्ट्रॉन एकत्र येतात. आणि मग हायड्रोजन म्हणजेच पाणी तयार होते.
एक नवं इंधन म्हणून हे उपयोगी होऊ शकतं असं अनेक वाहन कंपन्यांना आता वाटू लागलं आहे. मर्सिडिज बेंझ, होण्डा, ह्युंदाई, टोयोटा त्यावर अधिक काम करीत आहेत. टोयोटाने तर मिराई ही अशी कारही जपानमध्ये तसेच अमेरिकेच्या बाजारात उतरवलीही.
फ्युएल सेल व्हेकल – एफसीव्ही म्हणूनही तंत्रज्ञानावर चालणारी वाहने ओळखली जातात. अशा वाहनांच्या बॅटरीही त्वरित रिफ्युलिंग करता येतात. अवघ्या तीन ते चार मिनिटात अशा प्रकारे इंधन साठा करता येतो. एकदा असे झाले की वाहनही आरामात ४०० किलो मीटपर्यंत धावू शकते.
याबाबत सध्या मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा नसल्या तरी वाहन कंपन्या मात्र ते विकसित करण्यात अग्रेसर आहेत. त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठीचे तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. भविष्यात मात्र हेच इंधन वाहनांचे प्रमुख इंधन ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रणव सोनोने pranav.sonone@gmail.com