गेल्या आठवडय़ात तुम्ही टेस्लाबद्दल वाचलं. टेस्ला ही विजेरी वाहनांमध्ये कसे नवे मापदंड आखत आहे हे आपण पाहिलं. तिचे एलन मस्क हे अ‍ॅपल टेस्ला म्हणवून घ्यायला मुळीच कचरत नाही. या कारचे भविष्य हे एखाद्या घोडय़ावर आरूढ होण्याप्रमाणे असेल, असे ते म्हणतात. खरंय. केवळ सवयी बदलण्याचा भाग आहे. जिथे आपण त्रासदायक ट्रॅफिकमुळे कंटाळतो. तिथे ही कार बसण्याबाबत चालकाला व तिच्या सहप्रवाशांना आराम प्रदान करते. तिचे एस हे मॉडेल वाहतुकीनुसार वेग नियंत्रण राखणारे वाहन आहे. या कारमध्ये मार्गिका बदलणे, समोरच्या वाहनाबरोबर ठरावीक अंतर राखणे, अत्यावश्यकप्रसंगी ब्रेकचा वापर हे सारे सुलभ होते.
या कारची बॅटरी चार्ज करण्याची प्रक्रियाही खूपच सुलभ आहे. सुपरचार्जरच्या माध्यमातून हे करता येते. ८० टक्के बॅटरी ही अवघ्या ४० मिनिटात चार्ज होते. (आपल्याकडे असे चार्जिग स्टेशन नाहीत, ही खूपच खंत व्यक्त करणारी बाब आहे.)
भारतात मात्र टेस्ला येऊ शकत नाही. तिचे एक कारण हे त्यासाठी १०० टक्के उत्पादन कर हे होय. म्हणजेच जवळपास ७० लाख ते १.५० कोटी रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.
टेस्लाचे मॉडेल ३ हेही आता तेथे येऊ घातले आहे. त्याची आपल्याकडील किंमत म्हणजे १९ ते २५ लाख रुपये होऊ शकेल. अशा वाहनांना पूर्णपणे करातून म्हणजे विजेरी वाहनांना उत्पादन करातून पूर्णपणे सूट देण्याचा विचार महाराष्ट्र शासन करत आहे, असं कळतं.
आजघडीला एकूण वाहन उद्योगापैकी केवळ १ टक्काच विजेरी कार निर्मितीची बाजारपेठ आहे. विजेरी वाहनांना पर्यावरण व अधिक कार्यक्षम वाहने म्हणून प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचंही धोरण आहे. हे क्षेत्र जागतिक स्तरावर २०३० पर्यंत ८० अब्ज डॉलरचं होणार आहे. तेव्हा आता कुठे या क्षेत्रावरील भारताचं महत्त्व जाणवू लागलं आहे. नवी दिल्लीनजीकच्या महिन्यातील सुरुवातीला झालेल्या ऑटो एक्स्पोतूनही हेच जाणवलं. म्हणूनच महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा तसेच लोहिया ऑटोसारख्या कंपन्यांनी त्यांच्या वेगळ्या गटातील विजेरी वाहने यावेळी सादर केली होती.
प्रणव सोनोने pranavsonone@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा