या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
- माझे रोजचे ड्रायव्हिंग ४० किमी आहे. मला डिझेलवर चालणारी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट आठ लाख रुपये आहे. मला एखादी चांगली गाडी सुचवा. फियाट पुण्टो, आय २० किंवा पोलो यांबाबत संभ्रम आहे.
– नीलेश पवार
- तुमच्यासाठी फोक्सव्ॉगन पोलो ही गाडी उत्तम ठरेल. कारण ही गाडी दणकट, टिकाऊ आणि आरामदायी आहे. ही गाडी डिझेल टीडीआय व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ही गाडी मजबूत असून क्लच व गीअर या गोष्टीही चांगल्या आहेत.
- मला एक पेट्रोल व्हर्जन असलेली सात ते आठ आसनी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट नऊ ते दहा लाख रुपये आहे. कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेज असलेली गाडी हवी आहे. तरी मी कोणती गाडी घ्यावी हे सुचवावे.
– गोपाल गावीत
- तुमचे बजेट नऊ ते दहा लाख रुपये असेल तर तुम्हाला होंडा मोबिलिओ ही गाडी योग्य ठरेल. या गाडीचे पेट्रोल इंजिन खूप टिकाऊ आणि स्मूद आहे. हिचा मायलेजही उत्तम आहे. पण जर तुम्हाला खूपच स्पेशियस कार हवी असेल तर शेवरोले एन्जॉय ही गाडी घ्यावी. हिचे मायलेज १३ किमी प्रतिलिटर एवढे आहे. ही गाडी आठ जणांसाठी योग्य आहे. तसेच कमी किमतीत तुम्हाला मिळू शकेल.
- केयूव्ही१००चे फायदे आणि तोटे सांगा.
– सचिनकुमार नांदगुडे
- केयूव्ही१०० ही सर्वोत्तम कार आहे परंतु हिचे डिझेल व्हेरिएन्ट थोडे महाग आहे. तुमचे मासिक ड्रायव्हिंग १५ हजार किमीचे असेल तर ही गाडी तुम्ही घ्या असा सल्ला देणे चुकीचे ठरेल. अन्यथा तुम्ही पेट्रोल व्हेरिएन्ट घ्या. या गाडीचा आकार थोडा वेगळा असल्याने ती दिसायला आकर्षक वाटते. तसेच थोडा स्पोर्टी लूकही आहे.
- मला सेकंडहँड गाडी खरेदी करायची आहे. माझे बजेट दोन लाख रुपये आहे. एवढय़ा कमी बजेटात मला कार घेता येईल का. तुम्ही काय सुचवाल. मला सीएनजी किंवा एलपीजी गाडी हवी आहे.
– अजयकुमार जाधव
- तुमचे बजेट दोन लाख रुपये एवढेच असेल तर तुम्ही कृपया सीएनजी किंवा एलपीजी गाडय़ांच्या फंदात पडू नका. तुम्ही पाच-सात वर्षे जुनी व्ॉगन आर ही गाडी घ्या. किंवा शेवरोले बीट अथवा ह्य़ुंदाई आय१० ही गाडी घ्या. सेकंडहँड असल्या तरी या गाडय़ा चांगल्या चालतात.
- मला गाडी घ्यायची आहे. मला कृपया मारुती बालेनो आणि फिगो अस्पायर या गाडय़ांविषयी तुमचे मत सांगा. माझे मासिक ड्रायिव्हग साधारण ६०० किमी आहे. मुंबई व परिसरातच माझे जास्त फिरणे होते. सध्या माझ्याकडे सेकंड हँड सँट्रो िझग आहे.
– दीपक िशदे
- तुमचा गाडीवापर निव्वळ शहरापुरताच मर्यादित असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे मारुती बालेनो घ्या, कारण ही वजनाने हलकी आहे आणि ट्रॅफिकमध्येही हिचा वेग आणि मायलेज उत्तम राहू शकतो. फिगो अस्पायर ही महामार्गावरील वापरासाठी आहे आणि जर तुम्हाला ऑटोगीअर गाडी हवी असेल, तर मग तुम्ही नवीन वॅगन आर एएमटी ही गाडी घ्यावी.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com