- मला येत्या काही महिन्यांत कार घ्यायची आहे. माझे बजेट सात लाखांपर्यंत आहे. मला सेडान कार घ्यायची आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग हजार किमीपेक्षा जास्त नसेल. तुम्हाला फोक्सव्ॉगन अॅमियोविषयी काय वाटते.
– चंद्रकांत देसले
* अॅमियो खूप छान गाडी आहे. मात्र तिचा मेन्टेनन्स थोडा जास्त आहे. त्यापेक्षा तुम्ही फोर्ड अस्पायर ही गाडी घ्या. ही गाडी स्टर्डी तर आहेच शिवाय हिचा मायलेजही जास्त आहे.
- सर, माझे बजेट दहा लाख रुपये आहे. तसेच माझे मासिक ड्रायव्हिंग अंदाजे अडीच हजार किमी असेल. तरी मला कोणती गाडी घेणे योग्य ठरेल. पेट्रोल की डिझेल. स्कोडा रॅपिडबद्दल आपले मत काय आहे.
– पंकज भुसे
* तुमचे मासिक ड्रायव्हिंग खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही डिझेल कार वापरणेच योग्य ठरेल. स्कोडा रॅपिडचे टीडीआय इंजिन खूप दमदार आहे. परंतु त्याच किमतीत फोक्सव्ॉगन व्हेंटाचाही तुम्ही विचार करू शकता.
- पुढील वर्षी मारुती सुझुकीच्या इग्निस आणि स्विफ्ट या दोन गाडय़ा लाँच होणार आहेत, असे ऐकिवात आहे. या गाडय़ांबद्दल माहिती द्यावी.
– श्रवण कुलकर्णी, बीड
* इग्निस ही लहान कार असेल, परंतु जास्तीतजास्त स्टायलिश आणि क्वालिटी कार असेल. तिच्यात जास्तीतजास्त फीचर्स असतील. या कारचा मायलेजही सवरेत्कृष्ट असेल. नवीन स्विफ्ट या वर्षांच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. तिच्यात जरा शार्प स्पोर्टी लुक अॅड केलाय. तिचा डॅशबोर्डही खूप छान असेल. इंजिन बहुधा टबरेजेट असेल.
- माझी अल्टो एलएक्सआय ही मार्च २००७ मध्ये घेतलेली आहे. माझे रिनग वर्षांला जास्तीत जास्त पाच हजार किमी आहे. आतापर्यंत एकूण ४५ हजार किमी रिनग झाले आहे. माझ्या नोकरीची अजून ६ वष्रे शिल्लक आहेत. गाडीचे रिनग वाढण्याची शक्यता या ६ वर्षांत नाही. आता गाडी बदलावी का आणि कुठली घ्यावी? आता गाडी बदलली नाही तर निवृत्तीनंतर बदलायला होईल असे वाटत नाही. मला ऑटो ट्रान्समिशन गाडी घ्यायची आहे. कृपया गाडी सुचवा.
– श्रीनिवास एकसंबेकर
* तुमचे रिनग आणि वापर बघता तुम्ही सेलेरिओ एएमटी घ्यावी. ही गाडी उत्तम आहे आणि मारुतीची असल्यामुळे स्पेअरपार्ट्सही पुढचे १२-१५ वष्रे नक्कीच उपलब्ध असतील.
- ऑफिसमधून कार लोन मिळत असल्याने मला कार घ्यायची आहे. सध्या माझ्याकडे व्ॉगन आर आहे. माझे बजेट ६ ते ६.५ लाखांपर्यंत आहे. मासिक रिनग ३०० ते ४०० किमी किंवा कमी आहे. होंडा जाझ, स्विफ्ट डिझायर, हुंदाई ग्रान्ड आय १०, हुंदाईआय २० किंवा मिहद्र केयुवी १०० यापकी कोणती कार घ्यावी? मला होंडा जाझ आवडली आहे. सव्र्हिसिंग खर्च जास्त आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
– एस.जी. दांडेकर
* तुम्ही होंडा जॅझला प्राधान्य द्यावे. हिचे १.२ लिटर इंजिन खूप जास्त टिकाऊ आहेच शिवाय गाडीही खूप स्पेशिअस आहे. कमी वापर असल्याने मेन्टेनन्सही फारसा येणार नाही; परंतु सहा लाख ३० हजारांत तुम्हाला या गाडीचे बेसिक मॉडेलच मिळेल.
- मी पहिल्यांदाच कार घ्यायची ठरवली आहे. मारुती बलेनो नक्की करू का? तेवढे बजेट आहे. फक्त पेट्रोल की डिझेल संभ्रम आहे. मी रोज २५ किमी किंवा १२५ किमी प्रवास करण्याची शक्यता आहे आणि अधूनमधून बाहेरगावी. मार्गदर्शन करावे.
– संजयकुमार बेंडसुरे
* बलेनो ही उत्तम मायलेज देणारी कार आहे. पेट्रोल व्हर्जनमध्येही ही गाडी १८ किमी प्रतिलिटर वा त्याहून जास्त मायलेज देते. त्यामुळे तुम्ही ही गाडी नक्की घ्यावी. डिझेल गाडीचा मेन्टेनन्स खूप असतो व खर्चीकही असते ही गाडी.
- मला सीएनजी कारचे फायदे–तोटे सांगा. माझे बजेट पाच ते साडेपाच लाखांचे आहे आणि माझे रोजचे ड्रायिव्हग किमान ३४ किमी आहे. मी कोणती कार घेऊ? पेट्रोलवर चालणारी की सीएनजीवर?
– योगेश चव्हाण
* तुमचे दररोजचे ड्रायिव्हग असेल आणि शहरातच जास्त असेल तर तुम्ही वॅगन आर सीएनजी ही गाडी घ्यावी. ती तुमच्यासाठी उत्तम ठरेल. सीएनजी गाडीचा खर्च पेट्रोलपेक्षा खूप कमी असतो. सीएनजी पर्यावरणासाठी उत्तम आहे. सीएनजी इंजिन कार्बन कमी उत्सर्जति करते. सीएनजीचे काही तोटेही आहेत आणि ते म्हणजे गीअर सारखे बदलावे लागतात. क्लचप्लेट लवकर जाते. पॉवर कमी असते. इंजिन लवकर गंजण्याची शक्यता असते. तसेच डिक्कीची जागा अडते.
- मला माझी पहिलीच कार घ्यायची आहे. माझे बजेट सात लाख आहे.. माझे मासिक रिनग 1000 किमी असेल. त्यासाठी मला पर्याय सुचवा.. अॅटोमॅटिक किंवा मॅन्युअल, कोणती कार घेणे फायदेशीर राहील? कृपया पर्याय सुचवा.
– आर.आर. पाटील, जळगाव.
* सध्याच्या युगात अॅटोमॅटिक कार उत्तम आणि फायदेशीर ठरत आहेत. तुमचे रिनग बघता तुम्हाला मारुती बलेनो सीव्हीटी अॅटोमॅटिक डेल्टा हे मॉडेल घ्यावे. हे मॉडेल तुम्हाला सात लाख 30 हजारांपर्यंत मिळू शकेल. ही गाडी तुम्हाला १८ ते २० किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देऊ शकेल.
- माझ्या घरात आम्ही चार जण आहोत. आमचे मासिक ड्रायिव्हग किमान ४०० किमी असेल. मला रेनॉ क्विड खूप आवडते. मात्र तिचे इंजिन खूप आवाज करते. आमचे बजेट चार ते साडेचार लाख रुपये आहे. मी क्विड घ्यावी की नाही? तुम्ही कोणती गाडी सुचवाल?
– राहुल पोळ
* तुम्ही टाटा टियागो ही गाडी घ्यावी. हिचे १२०० सीसीचे इंजिन खूप ताकदवान आहे आणि ते आवाजही करत नाही. गाडी खूप स्टर्डी आहे आणि हिचे डिझाइन खूप आरामदायी आहे. गाडी खूप स्मूद आहे आणि तिचा मायलेजही चांगला आहे.
- नमस्ते सर, सध्या माझ्याकडे मारुती ८०० गाडी आहे,पण ती खूप जुनी झाल्याने बदलण्याचा विचार करत आहे. माझे महिन्याला ५०० ते ७०० किमी रिनग असते. मी अल्टो के१० किंवा क्विड घेण्याचा विचार करत आहे किंवा इतर कोणती गाडी घ्यावी? कृपया आपण मार्गदर्शन करावे.
– शरद जाधव, मीरज
* कृपया अल्टो के१० ही गाडी घेऊ नका. तुम्हाला जर ऑटो गीअरवर चालणारी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही वॅगन आर किंवा सेलेरिओ यापकी कोणतीही एक गाडी घ्या. नाही तर सरळ टाटा टियागो ही गाडी घ्या. टियागो अवघ्या चार लाखांत उपलब्ध आहे आणि दणकटही आहे. हिचे इंजिन खूप ताकदवान आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com