* सर, मला आय२० ही कार खूप आवडली आहे. मला पेट्रोल कार घेण्याची इच्छा आहे. माझे मासिक ड्रायिव्हग किमान एक हजार किमी असेल. माझे बजेट सात ते आठ लाख रुपये आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– परेश िशदे
* आय२० ही गाडी चांगली आहे, परंतु या गाडीला जरा कमी अॅव्हरेज आहे आणि पिकअपही थोडा कमी आहे. तुम्ही होंडा जॅझ किंवा मारुती बलेनो घ्यावी. या गाडय़ा जास्त अॅव्हरेज देतात आणि पिकअपही चांगला आहे.
* माझी उंची सहा फूट दोन इंच आहे. मी पहिल्यांदाच गाडी घेणार असून माझे बजेट सहा लाख रुपये आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग किमान १२०० किमी असेल. जुनी गाडी एलपीजीमध्ये रुपांतरित करू की नवीन गाडी घेऊ, कृपया कळवावे.
– विजय गवळी
* टाटा झेस्ट (एक्सएमए) डिझेल अॅटोमॅटिक गाडी तुम्ही घ्यावी. यात सर्वात जास्त लेगरूम आहे आणि स्टीअरिंगही खालीवर करता येते. एसयूव्हीमध्ये महिंद्रा टीयूव्ही३०० ही गाडी घ्यावी. बजेट कमी असेल तर केयूव्ही१०० घ्यावी. या तीनही गाडय़ा जास्त उंचीच्या माणसांसाठी उपयुक्त आहेत.
* माझे मासिक ड्रायव्हिंग अंदाजे ५०० किमी आहे. माझे बजेट सहा लाख रुपये आहे. माझ्यासाठी कोणती गाडी योग्य ठरेल, हे सांगा.
– ईश्वर कांतोडे
* मी तुम्हाला फोक्सव्ॉगन पोलो ही पेट्रोल व्हर्जनमधील गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी खूप चांगली आहे. ही ताकदवान गाडी असून आरामदायीही आहे.
* सध्या माझ्याकडे मारुती ८०० ही गाडी आहे. परंतु ती खूप जुनी असल्याने बदलण्याचा विचार करत आहे. माझे महिन्याला ५०० ते ७०० किमी रनिंग आहे. मी अल्टो के१० किंवा क्विड घेण्याच्या विचारात आहे. किंवा इतर कोणती गाडी घ्यावी हे सांगावे.
– शरद जाधव, मिरज
* मी तुम्हाला टाटा टियागो ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही गाडी कमी किमतीत खरंच अस्सल आराम देते. या गाडीचे इंजिनही ताकदवान आणि स्मूद आहे. अल्टो के१० आणि क्विड यांच्याच किमतीत तुम्हाला ग्रॅण्ड आय१० सारखी टियागो मिळते.
* मला महिंद्राची केयूव्ही१०० ही गाडी घ्यायची आहे. परंतु मला शंका आहे की तिचा गीअरबॉक्स डॅशबोर्डला अटॅच आहे. त्यामुळे मध्ये बसणाऱ्या माणसाला त्रास होऊ शकतो का, तसेच ड्रायव्हिंग करताना चालवणाऱ्याचा हात आखडणार नाही का? या गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे. तुमचे मत सांगा.
– रितेशकुमार सले, जत
* केयूव्ही१०० ही सहा आसनी गाडी आहे. त्यामुळे पुढे तिघे आणि मागे तीन जण बसू शकतात. परंतु पुढे नेहमीच तिघेच बसतील असे नाही. अगदी क्वचितच पुढे तिघे जण बसू शकतील. गाडी उत्तम आहे आणि ऑफ रोडलाही ती उत्तम चालते. तिचा मेन्टेनन्सही खूप कमी आहे. ती तुम्हाला किमान पाच लाखांपर्यंत तरी जाईल.
* माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० किमी आहे. आणि कदाचित त्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. मला प्रशस्त आणि सुरक्षित कार हवी आहे.
– मुकुंद गोरे
* इतक्या कमी ड्रायव्हिंगसाठी तुम्ही पेट्रोलवर चालणारी कारच घ्यावी. साधारण सहा लाखांत तुम्हाला मारुती स्विफ्ट घेणे उत्तम ठरेल.
* मला नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट तीन ते चार लाख रुपये आहे. आमचे मासिक ड्रायव्हिंग किमान १२०० किमी असेल. मी पेट्रोलवर चालणारी हॅचबॅक गाडी घ्यावी का. होय असेल तर माझ्यासाठी कोणती गाडी योग्य ठरेल ते सांगा.
– सुबोध कासलीवाल.
* तुमच्या बजेटनुसार मी तुम्हाला टाटा टियागो घेण्याचा सल्ला देईन. ही लांबच्या प्रवासासाठी चांगली गाडी आहे आणि पैसा वसूल गाडीही आहे.
* मला बलेनो गाडी घ्यायची आहे. परंतु तिचे सस्पेन्शन चांगले नाही तसेच गाडीचा पत्राही मजबूत नसल्याचे समजते. वस्तुस्थिती काय आहे. ही गाडी ठीक नसल्यास सात लाखांपर्यंत कोणती पेट्रोल गाडी योग्य ठरेल.
– मिलिंद कानडखेडकर, वर्धा
* बलेनो गाडी सिटी ड्रायव्हिंगसाठी उत्तम आहे. ती वजनाने हलकी असल्याने मायलेज जास्त देते. तुमचा गाडीचा वापर सिटीत जास्त असेल तर नक्कीच घ्या अन्यथा आय२० एलिट ही गाडी घ्या.
* माझा रोजचा प्रवास सव्वाशे किमीचा आहे. मला गाडी घ्यायची इच्छा असून माझे बजेट आठ लाख रुपये आहे. मला एक आरामदायी आणि दणकट गाडी हवी आहे. तुम्ही कोणती गाडी सुचवाल.
– पुरुषोत्तम माळोदे, वर्धा
* मायलेज देणारी डिझेल गाडी म्हणजे मारुती ब्रेझा. ही गाडी तुमच्यासाठी उत्तम ठरेल. अन्यथा हॅचबॅकमध्ये पोलो टीडीआय ही उत्तम आणि दमदार आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com