- टीयूव्ही ३०० एएमटी ही गाडी घ्यायच्या विचारात मी आहे. या गाडीबाबत आपले मत काय आहे. आणि अॅटोमॅटिक गीअरशिफ्ट गाडय़ांचा मेन्टेनन्स जास्त असतो का.
– बी. निनाद
* ऑटोमॅटिक गाडय़ांचा मेन्टेनन्स जास्त नसतो, परंतु काही काळानंतर गाडीत काही बिघाड निर्माण झाला तर मोठा खर्च येऊ शकतो. परंतु तुम्ही टीयूव्ही३०० एएमटी ही गाडी घेण्यास काहीच हरकत नाही. खूप छान गाडी आहे ही.
- माझा रोजचा प्रवास १५० किमी आहे. संपूर्ण प्रवास ग्रामीण भागातच असतो. मी कोणती कार घ्यावी, हे सुचवा.
– एक वाचक
* तुमचे बजेट नेमके किती आहे हे तुम्ही लिहिलेले नाही. बजेट कमी असेल तर बोलेरो घ्यावी. बजेट जास्त असेल तर एक्सयूव्ही ५०० ही उत्तम गाडी आहे.
- मला मारुतीची सिआझ झेडएक्सआय प्लस आणि होंडा सिटी पेट्रोलचे टॉप मॉडेल घ्यायचे आहे. मला हौस म्हणून गाडी घ्यायची आहे. या दोन्ही गाडय़ा मला फार आवडतात. मला अॅव्हरेजची चिंता नाही. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला पिकअप जास्त असणारी, वेगाने पळणारी, सायलेंट इंजिन असणारी अशी गाडी हवी आहे. या दोनपैकी मी कोणती गाडी घेऊ. मेन्टेनन्स जास्त असला तरी चालेल.
– रौनक लोढा
* तुम्ही ह्य़ुंदाई वेर्ना १.६ लिटर पेट्रोल ही गाडी घ्यावी. तिची पॉवर जास्त असून ती वेगाने पळते. किंवा मग फोक्सव्ॉगन व्हेंटो ही गाडीही खूप छान आहे.
- माझे रोजचे ड्रायव्हिंग ५० किमी आहे. सध्या मी व्ॉगन आर सीएनजी एलएक्सआय ही गाडी वापरतो. परंतु तिचा मेन्टेनन्स जास्त आहे. मला कमी मेन्टेनन्स असणारी कोणती गाडी योग्य ठरेल. टीयूव्ही ३०० टी४ किंवा टी६ यापैकी वा प्रीओन्ड चांगला पर्याय ठरेल.
– मनीष सेवलीकर
* कमी मेन्टेनन्ससाठी मारुती रिट्झ डिझेल ही गाडी चांगली आहे. परंतु रफ रोडसाठी टीयूव्ही ३०० ही गाडी उत्तम आहे. परंतु तिचा मेन्टेनन्स व्ॉगन आरपेक्षा जास्त आहे.
- मला सेकंडहॅण्ड किंवा नवीन कार घ्यायची आहे. माझे रोजचे ड्रायव्हिंग २०० किमी आहे. माझे बजेट साडेतीन ते चार लाख रुपये आहे. मला पुरेसे सेफ्टी फीचर्स असलेली किफायतशीर गाडी हवी आहे. पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजी कोणतेही मॉडेल चालेल.
– सतीश काळे
* मी तुम्हाला डिझेल टाटा टियागोचे एक्सई हे मॉडेल सुचवेन. ही गाडी पाच लाखांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच हिचा मायलेज २४ किमी आहे. ही गाडी दणकट आणि आरामदायी आहे. तसेच तुमचा ड्रायव्हिंगचा एकंदर पल्ला बघता मी तुम्हाला नवीन कार घेण्याचाच सल्ला देईन.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com