* मी नवीन गाडी घेण्याचा विचार करीत आहे. माझे मासिक रिनग जवळपास १००० आहे, माझे बजेड ७ लाखापर्यन्त आहे तर मी बलेनो पेट्रोल किंवा डिझेल यापकी कोणती गाडी घ्यावी किंवा इतर पर्याय बदल मार्गदर्शन करावे?
– राजू ढोकणे
* तुम्ही डिझेलवर चालणारी गाडीच घ्यावी. आणि तुम्हाला दणकट अशी गाडी हवी असेल तर तुम्ही पोलो टीडीआय ही गाडी घ्यावी आणि कमी मेन्टेनन्सवाली गाडी हवी असेल तर स्विफ्ट व्हीडीआय ही गाडी घेऊ शकता.
* माझे बजेट सहा लाख रुपये आहे. मला टाटा टियागो एक्सझेड ही पेट्रोल व्हेरिएंट गाडी घ्यायची आहे. मी एकदम नवखा असून ड्रायव्हिंग शिकत आहे. टियागो घेणे उचित ठरेल का. माझे मासिक ड्रायव्हिंग २०० ते २५० किमी असेल.
–भूपेंद्र म्हात्रे.
* होय, टियागो ही गाडी अगदी पैसे वसूल गाडी आहे. तीत तुम्हाला १२०० सीसीचे इंजिन आणि सर्व सेफ्टी फीचर्स मिळतील. परंतु मायलेज जरा कमी मिळेल. गाडीचा वापर कमी असेल तर ही पेट्रोल गाडी उत्तमच आहे.
* मला नवीन कार घ्यायची आहे. स्पेशियस, कमी मेन्टेनन्सवाली, चांगला मायलेज देणारी वगैरे अशी गाडी मला हवी आहे. आमचे बजेट साधारण पाच ते सहा लाख रुपयांचे आहे. कृपया मार्गदर्शन करा.
–निशा शिंदे
* सर्वात सेफ्टी असलेली कार म्हणजे फोक्सव्ॉगन पोलो. परंतु हिची किंमत सहा ते साडेसहा लाख रुपये एवढी आहे. पाच ते सहा लाखांत तुम्ही ह्य़ुंडाईची ग्रँड आय१० ही गाडी घेऊ शकता.
* मला फॅमिली कार घ्यायची आहे. मी डॅटसन गो प्लस या गाडीचा विचार करते आहे. ही निवड योग्य ठरेल का. माझे बजेट सहा लाखांपर्यंत आहे. मला योग्य निर्णय सुचवा.
–पूजा शिरसाट
* तुम्ही बूट स्पेसचा वापर करणार असाल तर डॅटसन गो, गो प्लस या गाडय़ा चांगल्या आहेत. परंतु इंजिन आणि कम्फर्टचा विचार करता या गाडय़ांत सहा लाख रुपये गुंतवण्याचा सल्ला देणे योग्य नाही. त्यापेक्षा तुम्ही फोर्डची नवी फिगो किंवा शेवरोलेच्या सेल एचबी यापैकी एकीला प्राधान्य द्या.
* माझ्याकडे मारुती व्हिटारा ब्रेझा ही गाडी आहे. मला या गाडीत रिव्हर्स कार पार्किंग सेन्सर्स टाकायचे आहेत. ही सुविधा कोणती कंपनी चांगल्या तऱ्हेने पुरवते आणि ती ऑनलाइन असू शकेल का.
–ऋतुराज जगताप
* होय, रिव्हर्स कार पार्किंगचे विथ कॅमेरा आणि विथ सेन्सर्स असे दोन पर्याय असतात. तुम्ही कॅमेरा आणि सेन्सर्स असलेले युनिट घ्या. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. काही कंपन्या त्यात जीपीएसचीही सुविधा देतात. ऑटोकॉप, व्हाएजर, गार्मिन अशा उत्तम कंपन्या या क्षेत्रात आहेत. आठ ते १५ हजारांत अशा सुविधा त्या उपलब्ध करून देतात.
* सर माझे बजेट १५ ते २० लाख रुपये आहे. मला आरामदायी आणि ऑफ रोड असलेली योग्य गाडी सुचवा. मला एक्सयूव्ही५०० किंवा इनोव्हा क्रिस्टा यापैकी कोणती योग्य ठरेल. किंवा त्या किमतीत दुसरी कोणती एसयूव्ही घेता येऊ शकेल. आणि पजेरो स्पोर्ट्सचा पर्याय योग्य ठरू शकतो काय, या सगळ्यांची उत्तरे द्या.
–चेतन घंगाळे, नाशिक
* इनोव्ही ही एक उत्तम आरामदायी पॅसेंजर कार आहे. तुमच्यासाठी एखादी छोटी एसयूव्ही किंवा एक्सयूव्ही५०० उत्तम ठरेल. निसान टेरानो ही एक उत्तम इंजिन असलेली आणि चांगला मायलेज देणारी एसयूव्ही आहे. तिला प्राधान्य द्या.
* माझे दर १५ दिवसांनी शेतीकाम पाहण्यासाठी गावी जाणे होते. दरमहा किमान ८०० किमीचा प्रवास होतो. माझे आठ–नऊ लाखांचे बजेट आहे. ब्रिझा, डिझायरबद्दल आपले मत काय आहे. कृपया सांगा.
– संजय इंगळे
* रफ रोडवर चालणारी सर्वात जास्त आरामदायी गाडी म्हणजे फोर्ड इकोस्पोर्ट. तुम्ही तिचे पेट्रोल व्हेरिएंट घेऊ शकता. डिझेलवर चालणारी गाडी हवी असेल तर ब्र्रेझाचा पर्याय उपलब्ध आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com