* माझ्याकडे सँट्रो झिंग ही गाडी आहे. मला कमी मेन्टेनन्स आणि जास्तीतजास्त मायलेज देणारी गाडी हवी आहे. रिट्झ आणि केयूव्ही१०० या गाडय़ा मला आवडतात. माझे बजेट साडेपाच लाखांपर्यंत आहे.

के. धनंजय

* रिट्झ सध्या खूप कमी उपलब्ध आहेत. तरी तुम्ही शोरूममध्ये जाऊन चौकशी करू शकता. कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाडय़ांत सेलेरिओही उत्तम आहे. ती तुम्हाला अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पाच-साडेपाच लाखांत उपलब्ध असेल.

 

* मी सध्या अल्टो एलएक्सआय ही गाडी वापरत आहे. मला ही गाडी एक्स्चेंज करायची आहे. माझे बजेट दहा ते ११ लाख रुपये आहे. मला मारुतीचीच गाडी घ्यायची आहे. सध्या बलेनो आणि एस क्रॉस या गाडय़ा जास्त दिसतात. कृपया मार्गदर्शन करा.

अक्षय करमरकर

 

* तुम्हाला मारुतीचीच गाडी घ्यायची असेल तर व्हिटारा ब्रेझा ही गाडी घेऊ शकता. परंतु ती सध्या तरी डिझेलमध्येच उपलब्ध आहे. तुमचे ड्रायव्हिंग कमी असेल तर पेट्रोलवर चालणारी ह्य़ुंडाई क्रेटा घ्यावी. ती सध्याची उत्तम कार आहे.

 

* आम्ही टाटा टियागो पेट्रोल व्हेरिएंट घेण्याच्या विचारात आहोत. आमचे वार्षिक ड्रायव्हिंग १५ हजार किमीचे आहे. ही गाडी घेणे योग्य ठरेल का.

सुशांत माने

 

* होय, ही पैसा वसूल अशी गाडी आहे. सहा लाखांत तुम्हाला टियागोचे टॉप मॉडेल मिळू शकेल. त्यात तुम्हाला सर्व सेफ्टी फीचर्स मिळतील. या गाडीचे १२०० सीसीचे इंजिनही शक्तिमान आहे.

* मला क्विड गाडी घेण्याची खूप इच्छा आहे. माझे बजेट तीन लाखांचे आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग तीन ते चार हजार किमीचे आहे. ही गाडी घेणे योग्य ठरेल का.

अभिजित शिंदे, भूम

* होय, क्विड ही अतिशय प्रसिद्ध आणि दिसायला देखणी अशी छोटी कार आहे. ड्रायव्हिंगसाठीही उत्तम अशी ही कार आहे. परंतु तुमचे जास्त ड्रायव्हिंग हायवेवर असेल तर मात्र तुम्ही टाटा टियागोला प्राधान्य द्या. ही गाडी कमीत कमी किमतीत तुम्हाला मिळू शकेल.

 

* आमचे चार जणांचे कुटुंब आहे. सध्या माझ्याकडे नॅनो ही गाडी आहे. दीड वर्षांत ती जवळपास दहा हजार किमीपर्यंत चालवली. मला गाडी बदलायची आहे. कोणती गाडी घेऊ.

तन्मय बने, ठाणे

* तुम्ही फोक्सव्ॉगनची अ‍ॅमियो ही गाडी घ्यावी. ती कॉम्पॅक्ट सेडान आहे. दिसायलाही फॅमिली कारसारखी दिसते. क्वालिटी आणि सेफ्टीच्या दृष्टीने फोक्सव्ॉगन गाडय़ा उत्तम आहेत.

 

* मी आता ६१ वर्षांचा आहे. मला बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज बेन्झ ई२५० ई२०० (पेट्रोल) गाडी घ्यायची आहे. मी यापैकी कोणती घ्यावी. मी महिन्यातून एकदा तरी बाहेरगावी जातो.

नंदकुमार कुलकर्णी

* तुमचा वापर कमी असल्याने तुम्ही मर्सिडीज सीएलए २०० ही गाडी घ्यावी. पेट्रोल स्पोर्टमधील मॉडेल तुम्ही घ्यावे. या गाडीची ऑनरोड किंमत किमान ३८ लाख रुपये इतकी आहे.

 

*  टाटा टियागो, रेनॉ क्विड, व्ॉगन आर, सेलेरिओ यापैकी कोणती गाडी ॅव्हरेज, मेन्टेनन्स, सव्‍‌र्हिसच्या दृष्टीने चांगली आहे.

राजीव मराठे

* मेन्टेनन्स आणि मायलेजच्या दृष्टीने व्ॉगन आर ही सगळ्यात चांगली गाडी आहे. परंतु बजेट कमी असेल तर क्विड ही गाडीही योग्य आहे. व्ॉगन आर पाच लाखांत उपलब्ध असून त्यात तुम्ही एएमटी मॉडेलही घेऊ शकता.

 

* मला प्रथमच गाडी घ्यायची आहे. माझे बजेट साडेचार लाखांपेक्षा जास्त नाही. मी नेमकी कोणती गाडी घ्यावी, याबाबत मनात गोंधळ आहे. डॅटसन गोबद्दल तुमचे मत काय आहे. कृपया मार्गदर्शन करा.

भालचंद्र जमदाडे

* डॅटसन गो ही स्पेशियस आणि आरामदायी गाडी आहे. चार-साडेचार लाखांत ती तुम्हाला मिळू शकते. १२०० सीसीचे इंजिन या गाडीला आहे तसेच तिचा मेन्टेनन्सही कमी आहे आणि मायलेज चांगला आहे.

 

* माझे बजेट सहा लाख रुपये आहे. मला टाटा टियागो एक्सझेड ही पेट्रोल (एबीएस, ईबीडी आणि एअर बॅग्ज यांसह) गाडी घ्यायची आहे. मी एकदम नवखा असून गाडी शिकत आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग २०० ते २५० किमी असेल.

भूपेंद्र म्हात्रे

* एबीएस, एअरबॅग्ज वगैरे सहित सर्व पॅकेज असलेली सेलेरिओ तुम्हाला सहा लाखांत मिळू शकते. परंतु ती एक हजार सीसीची गाडी आहे. तुम्ही टियागोला प्राधान्य द्यायला हरकत नाही.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com