* मला ह्य़ुंडाई क्रेटा ही गाडी घ्यायची आहे. कृपया मला सांगा की ही गाडी घेणे योग्य ठरेल का? मी ई–प्लस मॉडेल घ्यावे की एसएक्स प्लस, हेही सांगा. कारण एसएक्स प्लसमध्ये अनेक फीचर्स आहेत आणि त्यासाठी ते जास्त पसे घेतात.
– संदीप संसारे, दादर
* होय, एसएक्स प्लसमध्ये खूप सारी वैशिष्टय़े आहेत आणि म्हणून ती महाग आहे. या गाडीचे स्पेशल डायमंड कट अलॉय व्हील्स खूप महागडे आहेत. अॅडऑन सेफ्टी म्हणून चार अतिरिक्त एअरबॅग्ज आहेत. ग्लोबल पोझिशिनग सिस्टीम प्लस रिव्हर्स पार्किंग कॅमेरा विथ सेन्सर्स हे फीचर्सही आहेत. तुम्हाला दीर्घकाळपर्यंत गाडी वापरायची असेल तर ही गाडी घेण्यास काही हरकत नाही.
* मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझा रोजचा प्रवास ७०८० किमीचा असून माझे बजेट सहा लाख रुपयांचे आहे. गावी जायचे असेल तर माझे ड्रायिव्हग ५०० किमी होईल. कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेज असणारी कोणती गाडी मी घ्यावी? टाटा टियागो कशी आहे.
– संदीप निवडंगे
* होय, तुम्हाला टाटा टियागो डिझेल हा एक पर्याय उत्तम ठरेल. तुम्हाला सहा लाखांत रिट्झ एलडीआय हा डिझेल या गाडीचा पर्यायही उपलब्ध आहे. यात स्पेसही चांगली आहे आणि जास्त पॉवरफुलही आहे रिट्झ.
* आमचे चौकोनी कुटुंब आहे. मला माझ्या कुटुंबासाठी गाडी घ्यायची असून बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. आम्ही प्रासंगिकच गाडीचा वापर करणार असल्याने महिन्याचे रिनग फारसे नसेल. कृपया चांगली गाडी सुचवा.
– मंदार विरकर, ठाणे
* तुम्ही रेनॉ क्विड घेऊ शकता. चार-साडेचार लाखांत उत्तम कार आहे. आणि तुमच्या गरजांनुरूप आहे.
* माझा रोजचा प्रवास ६४ किमीचा आहे. त्यात ४० किमी हायवे आहे. मला कमी मेन्टेनन्स आणि चांगला मायलेज असलेली गाडी हवी आहे. टियागो, क्विड, अल्टो आणि ग्रँड आय१० यांपकी कोणती गाडी घ्यावी.
– सूर्यकांत घाडगे.
* तुमच्या ड्रायिव्हगचा प्रकार पाहता मी तुम्हाला फोर्ड फिगो १.५ डिझेल ही गाडी सुचवेन. हिचे इंजिन ताकदवान तर आहेच शिवाय हिचा मायलेजही प्रतिलिटर २४ किमी एवढा आहे. तुम्ही याच गाडीला प्राधान्य द्या.
* मला कॉम्पॅक्ट सेडान कार घ्यायची आहे. जी शहरात आणि हायवेलाही उत्तम असेल. चांगले सेफ्टी फीचर्सही तिच्यात असायला हवेत. मला झेस्ट, स्विफ्ट डिझायर आणि होंडा अमेझ या तीनही गाडय़ा आवडतात. परंतु नेमकी कोणती घ्यावी, याविषयी गोंधळ आहे. कृपया मला योग्य गाडी सुचवावी.
– सोमनाथ कर्डक
* तुम्हाला मोठी एसयूव्ही हवी असेल तर टीयूव्ही ३०० हा एक चांगला पर्याय आहे. परंतु तुम्हाला सेडानच घ्यायची असेल तर फोक्सवॅगन अॅमिओ टीडीआय हा उत्तम पर्याय आहे.
* माझे बजेट चार लाखांच्या आसपास आहे आणि महिना २०० किमीपर्यंत ड्रायिव्हग करण्यासाठी कोणती गाडी या बजेटमध्ये उपलब्ध आहे?
– अतुल जोशी
* इतके कमी ड्रायिव्हग असेल तर वॅगन आरचा पर्यायच योग्य ठरेल. सात-आठ वर्षांनी तिला उत्तम रिसेल व्हॅल्यूही मिळू शकेल.
* मी नवीन कार घेऊ इच्छितो. माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. मला टियागो ही गाडी आवडते. माझे मासिक ड्रायिव्हग १५० ते २०० किमी इतके आहे. मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझ्या घरापासून टाटांचे सíव्हस सेंटर ८० ते १०० किमीवर आहे, तर मारुती व ह्युंदाईचे २२ किमीवर आहे. मी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल, असे तुम्हाला वाटते.
– भाऊसाहेब हासे
* सíव्हस सेंटर लांब असेल तर तुम्ही मारुतीची सेलेरिओ ही गाडी घ्यावी. त्यात तुम्हाला एएमटी ऑप्शनही उपलब्ध आहे. आणि मारुती गाडय़ांचे पार्ट्स सर्वत्र उपलब्ध असतात. मायलेज टियागोपेक्षा चांगला आहे.
* नवीन घेतलेल्या गाडीत स्थानिक दुकानांतून विकत घेतलेल्या इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीज लावल्या तर त्यामुळे कारच्या वॉरंटीमध्ये काही फरक पडू शकतो का.
– अमेय चंदनशिवे
* होय, परंतु पूर्ण वॉरंटी जात नाही फक्त इलेक्ट्रिकल कॉम्पोनन्ट्सची वॉरंटी बाद होते. परंतु साध्या म्युझिक सिस्टीम लावण्याने काही होत नाही. पण जर तुम्ही जास्त व्ॉटचे हॅलोजन लावत असाल तर बॅटरी, सर्किटवर ताण येतो.
* मला रेडी गो ही गाडी घ्यायची आहे. गाडीचा जास्त वापर नसेल. फक्त साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीच ड्रायव्हिंग करेन. रेडी गो या गाडीचा मायलेज कसा आहे, कृपया सांगा.
– मयुर, मुंबई
* रेडी गो ही गाडी चटपटीत आहे! वजनाने हलकी असल्याने तिला इंजिनाची पॉवर खूप जास्त मिळते. स्टीअरिंगही खूप फ्री आहे. तसेच सस्पेन्शनही आरामदायी आहे फक्त थोडे व्हायब्रेशन्स जाणवतात, ही गाडी चालवताना.
* मी प्रथमच गाडी विकत घेणार आहे. माझे बजेट साधारण पाच ते सात लाख रुपये आहे. कृपया मला चांगली गाडी सुचवा.
– उल्हास अहिरे, नाशिक
* तुमच्या एकंदर बजेटनुसार तुमच्यासाठी टाटा झेस्ट ही गाडी तुम्हाला योग्य ठरेल. हिचे रिअर सीट अगदी आरामदायी आहे तसेच ड्रायव्हिंग केबिनही सायलेंट आहे आणि व्हायब्रेशन्स कमी जाणवतात.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com