* माझे बजेट आठ ते साडेआठ लाख रुपये आहे. मी बलेनो किंवा एक्सेंट या गाडय़ांच्या पेट्रोल व्हर्जनचा विचार करत आहे. माझे मासिक ड्रायिव्हग किमान ५०० किमी असेल. मला योग्य तो पर्याय सुचवा.

अनिल सरोदे, अहमदनगर

* आठ-नऊ लाखांत मारुती सिआझ व्हीएक्सआय ही गाडी घ्यावी. हिचे पेट्रोल इंजिन आणि कम्फर्ट उत्तम आहे. तसेच ही गाडी दिसायलाही अलिशान आहे.

 

* माझ्याकडे होंडा अमेझ पेट्रोल ही गाडी आहे. परंतु माझे अधिकांश ड्रायिव्हग ग्रामीण भागात होत असल्यामुळे आणि अमेझचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी असल्याने गाडी खूप काळजीपूर्वक चालवावी लागते. म्हणून गाडी बदलण्याचा विचार आहे. माझे साप्ताहिक ड्रायिव्हग २५० किमी आहे. पाच जणांसाठी पुरेशी ठरेल, अशी गाडी सुचवा.

नरेंद्र धुमाळ

* तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल अशी दणकट आणि आरामदायी गाडी म्हणजे फोर्ड इकोस्पोर्ट. ही गाडी खडबडीत रस्त्यांवरही उत्तम चालते. तुम्ही या गाडीचे डिझेल मॉडेल घेऊ शकता. या गाडीचा मायलेज २३ किमी प्रतिलिटर एवढा आहे.

 

* सर मी बलेनो सिग्मा पेट्रोल कार बुक केली आहे मला बलेनो कारबद्दल पूर्ण माहिती हवी आहे कारचा परफॉर्मन्स कसा आहे. माझे दर आठवडय़ाला ६० ते ८० किलोमीटर रिनग आहे गाडीचा ऑन रोड ॅव्हरेज किती मिळेल हे सांगून मला योग्य अशी कार सुचवा.

भास्कर चौधरी, नाशिक

* होय, बलेनो ही कार इतर कार्सपेक्षा हलकी असली तरी स्टर्डी आणि कम्फर्टेबल आहे. सिटीसाठी उत्तम कार आहे. या गाडीचा मायलेजही १७-१८ किमी प्रतिलिटर एवढा आहे. मेन्टेनन्स आणि लाइफ तसेच तुमच्या रिनगप्रमाणे ही कार जास्त वष्रे तुम्ही वापरू शकाल.

 

* मी प्रथमच गाडी घेणार आहे. मला रेडी गो ही गाडी घेण्याची इच्छा आहे. कृपया मला या गाडीच्या परफॉर्मन्सविषयी सांगा. या गाडीपेक्षा अन्य कोणती गाडी चांगली आहे का, हेही सांगा. मायलेज, कमी मेन्टेनन्स आणि सेफ्टी या तीन गोष्टींना माझे प्राधान्य आहे. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे.

विनय कसबे

* तुमचे बजेट जर पाच-सहा लाख रुपयेच असेल तर तुम्ही निश्चितच मारुती सेलेरिओ घ्यावी. ही गाडी चांगला मायलेज तर देतेच शिवाय पॉवर आणि कम्फर्टसाठीही उत्तम आहे. आणि ग्रामीण भागात ही मेन्टेनन्सलाही सोपी पडते.

 

* माझे महिन्याचे रिनग ३०० किमी आहे, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, हॅचबॅकमध्ये, ॅव्हरेज चांगला देणारी, किमतीत परवडणारी, दणकट अशी वैशिष्टय़े असलेली कोणती गाडी घ्यावी? कृपया सुचवा. मारुती बलेनो घ्यायची आहे. कृपया या गाडीबद्दल आपले मत सांगा.

कृष्णकांत, पुणे

* होय बालेनो ऑटोमॅटिक ही गाडी ७.५० लाखांत येते त्यात एबीएस आणि एअरबॅग्जही आहेत. ही गाडी मायलेजही उत्तम देते.

 

* माझे शहरातच महिन्याकाठी सुमारे ३०० किमी ड्रायिव्हग होते. दोनतीन महिन्यांत एकदा मी लाँग ड्राइव्हलाही जातो. माझे बजेट साधारणत: सात लाख रुपये आहे. पोलो, ब्रिओ, फिगो आणि स्विफ्ट यांपकी कोणती गाडी घ्यावी. पोलो पेट्रोलला जास्त मेन्टेनन्स आहे का?

अनिकेत मनोरकर, जळगाव

* प्रथमत: मी तुम्हाला स्विफ्ट झेडएक्सआय ही गाडी घेण्याचा सल्ला देईन, कारण या गाडीचे इंजिन खूप चांगले आणि ताकदवान आहे. मेन्टेनन्सही कमी आहे. अन्यथा तुम्ही होंडा जॅझचाही विचार करू शकता.

 

* मी निवृत्त व्यक्ती असून माझ्याकडे सध्या नॅनो एलएक्स ही गाडी आहे. परंतु मला महिन्यातून किमान एकदा तरी पुण्याला जावे लागते. त्यामुळे मला आता नवीन गाडी घ्यायची आहे. तुमचे क्विड एएमटीबद्दल काय मत आहे. मला ऑटो गीअर गाडी घ्यायची आहे. मी होंडा जॅझही पाहिली परंतु ती माझ्या बजेटमध्ये बसत नाही. मला असेही सांगण्यात आले आहे की, ऑटो गीअरच्या गाडय़ांचा मेन्टेनन्स खूप असतो. कृपया मला योग्य मार्गदर्शन करा.

राजीव गीध.

* माझ्या मते क्विड एएमटी ही गाडी ऑनरोड तुम्हाला साडेपाच लाखांपर्यंत मिळू शकेल. या गाडीत मॅन्युअल गीअर ऑप्शन नाही. त्यामुळे मी तुम्हाला सेलेरिओ किंवा वॅगन आर किंवा अल्टो के१० या गाडय़ांचा विचार करण्याचा सल्ला देईन. या सर्व गाडय़ांचे इंजिन एक हजार सीसीचे आहे आणि त्या मायलेजही चांगला देतात. तसेच त्या ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही प्रकारांत आहेत. स्पेसही चांगली मिळते.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com