• मी रेनॉची क्विड गाडी बुक केली होती. मात्र, टाटांची टिआगो बाजारात आल्यानंतर मी माझा निर्णय स्थगित केला. टियागो कशी आहे. चांगली आहे का. कृपया सांगा.

– अरविंद कुलकर्णी

* होय. टाटा टियागो खूप चांगली गाडी आहे. क्विडपेक्षा ही गाडी नक्कीच चांगली आहे.

* बलेनो अल्फा पेट्रोल व स्विफ्ट व्हीडीआय यांच्यात काय फरक आहे. या दोन्हींपैकी सरस गाडी कोणती.

– प्रताप कांबळे

* स्विफ्ट ही सरस गाडी आहे. बलेनो स्पेशियस आणि मायलेजसाठी उत्तम आहे; परंतु बलेनो वजनाने हलकी आहे. तुम्हाला जास्त स्टर्डी गाडी हवी असेल तर नक्कीच स्विफ्ट किंवा फोर्ड फिगो ही गाडी घ्या.

  • मला गाडी घ्यायची आहे; परंतु तिचा टॅक्सी किंवा तत्सम व्यावसायिक वापर करायचा आहे. माझ्याकडे सध्या टाटा इंडिका ही गाडी आहे. मात्र, मी तिचा एसी लावला की गाडीचा वेग कमी होतो. त्यामुळे मला आता नवीन गाडी घ्यायची आहे. पुण्टो, व्हेरिटो, फिगो, लिवा यांपैकी कोणती गाडी चांगली आहे किंवा इतर कोणता पर्याय आहे.

– राहुल गोरे.

* टाटा बोल्ट ही खूप छान कार आहे. तिचे १२४८ सीसीचे इंजिन दणकट आहे. सर्व प्रसिद्ध गाडय़ांमध्ये बोल्ट जास्त सरस ठरते. तिचा ग्राऊंड क्लिअरन्स खूप चांगला आहे. शिवाय स्पेशिअस आणि स्टर्डी आहे.

  • सर, मला नवीन कार घ्यायची आहे. माझे रोजचे रनिंग ५० ते ६० किमी आहे. गावे आणि हायवे अशा दोन्ही ठिकाणांवर मला जावे लागते. माझे बजेट सहा ते सात लाख रुपये आहे. मला कोणती गाडी जास्त योग्य ठरेल.

– विक्रम पवार.

* तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवून आठ लाखांपर्यंत न्या. या बजेटमध्ये तुम्हाला महिंद्राची टीयूव्ही३०० ही डिझेलवर चालणारी खूप छान एसयूव्ही मिळू शकेल. मात्र, तुमाहाला लो बजेट कार घ्यायची असेल तर मग मारुती रिट्झ डिझेल ही गाडी मी तुम्हाला सुचवेन.

या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com