माझ्याकडे सध्या स्विफ्ट व्हीडीआय ही गाडी आहे. परंतु ती खूप आवाज करते त्यामुळे मला बदलायची आहे. माझे ड्रायिव्हग खूप कमी आहे त्यामुळे मला वाटते की मी पेट्रोल गाडी घ्यावी. मला क्विड अथवा रेडी गो यांपकी एखादी गाडी घ्यावीशी वाटते. माझ्यासाठी कोणती गाडी योग्य ठरेल.

नंदकुमार येडगे

तुम्ही पेट्रोल गाडी घ्यावी पण अगदीच बजेट कमी असेल तर क्विडचा विचार करा; नाही तर तुम्ही मारुती सलेरिओ / टाटा टियागोचा विचार करा. या गाडय़ांमध्ये १०००/१२०० सीसी इंजिन असून अगदी स्मूथ चालतात.

मला पाच ते सात लाखांत सर्वात उत्तम कार सुचवा.

निखिल गहाणे

मी तुम्हाला फोक्सवॅगन पोलो किंवा मारुती बालेनो घेण्याचा सल्ला देईन. तुमचे रिनग जास्त असेल तर डिझेल पुन्टो घ्यावी. ही कमीतकमी किमतीत चांगली अशी कार आहे.

मला सीएनजी गाडी घ्यायची आहे आणि माझ्यासमोर दोन पर्याय आहेत, एक म्हणजे ुंडाई व्हेर्ना आणि अर्टिगा. मी काय करू.

रणजित ढवळे

मी तुम्हाला मारुती सिआझ घेण्याचा सल्ला देईन, ती तुम्ही डिझेलमध्ये घ्या किंवा पेट्रोल घेऊन काही वर्षांनी सीएनजी करा हेच तुम्हाला योग्य ठरेल. ही गाडी उत्कृष्ट आहेच आणि जास्त आरामदायी आहे.

आमचे बजेट नऊ ते १२ लाख रुपयांचे आहे. आम्हाला एसयूव्ही घ्यायची आहे, जी ग्रामीण भागातील रस्त्यांवरही चांगली चालेल आणि तिचा मेन्टेनन्सही कमी असेल. निसान टेरानो किंवा होंडा बीआरव्ही कशा आहेत.

श्रीकांत सावळे

ग्रामीण भागात आरामदायी एसयूव्ही पाहिजे असल्यास तुम्ही ह्य़ुंडाई क्रेटा किंवा फोर्ड इकोस्पोर्ट यांचा विचार करा. या दोन्ही गाडय़ांचे सस्पेन्शन उत्तम आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर या गाडय़ांचा काही त्रास नाही. तुम्ही याशिवाय महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचाही विचार करू शकता. परंतु ती आणखी हेवी गाडी आहे.

माझे बजेट चार ते पाच लाखांपर्यंत आहे. मी प्रथमच गाडी घेणार आहे. मला पेट्रोल कारमध्ये क्विड, अल्टो, व्ॉगन आर, ह्य़ुंडाई ईऑन यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, ते सांगा. मी निमशहरी भागात राहतो. सरासरी ५०० किमी प्रतिमहिना एवढा माझा गाडीचा वापर असेल.

हरिपाल काळे

तुम्ही नक्कीच रेनॉ क्विड हा पर्याय निवडावा. या गाडीला जास्त मेन्टेनन्स नसून वर्षांतून एकदा सव्‍‌र्हिसिंग करावे लागते. आणि या गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्सही उत्तम आहे. त्यामुळे रफ रोडवरही ही गाडी उत्तम चालते. मायलेजही चांगले आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com