माझ्याकडे स्कोडा ऑक्टोव्हिया ही गाडी आहे. माझे अलीकडेच मणक्याचे ऑपरेशन झाले आहे. स्कोडा मला ठेंगणी वाटते. पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत मला कोणती गाडी घेता येईल, कृपया सांगावे.
– शेखर गुडघे, अमरावती
तुम्ही नक्कीच मारुती सुझुकी इग्निस एएमटी ही गाडी घ्यावी. ही गाडी बसायला योग्य आहे आणि क्लच नसल्याने मणक्यांवर दाब येणार नाही आणि ही गाडी तुम्ही उत्तमरित्या चालवू शकाल. दुसरा पर्याय व्ॉगन आरचा आहे. परंतु या गाडीचे सस्पेन्शन अशक्त असल्याने त्रास होऊ शकतो.
मला बीएमडब्ल्यू जीटी एम स्पोर्टस् ३३०आय ही गाडी घ्यायची आहे. ही गाडी कशी वाटते याबद्दल कृपया माहिती द्या.
– प्रथमेश रक्षे
ही गाडी अतिशय उत्तम असून इंजिन उत्तम पीकअपचे आहे. या गाडीचे मायलेज खूप कमी असू शकेल. ग्राऊंड क्लिअरन्सही जरा कमीच आहे. हायवेवर ही गाडी उत्तम ठरेल.
मला पर्यटन क्षेत्रासाठी गाडी घ्यायची आहे. पर्यटकांसाठी तसेच खिशाला परवडू शकेल अशी कोणती गाडी योग्य आहे.
– रंजना सुरमुख
पर्यटनासाठी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही सर्वोत्तम गाडी आहे. या गाडीचे ऑटोमॅटिक मॉडेल १७ ते १९ लाखांपर्यंत उपलब्ध आहे. यापेक्षा तुमचे बजेट कमी असेल तर रेनॉची लॉजी ही गाडीही चांगला पर्याय ठरू शकते.
मासिक ड्रायव्हिंग एक हजार किमीहून जास्त असेल तर कोणती गाडी योग्य ठरते. पेट्रोल की डिझेल.
– अविनाश पाटील, पुणे
आता असं आहे की पेट्रोलवर चालणाऱ्या गाडय़ाही चांगला मायलेज देतात आणि त्यांचा मेन्टेनन्सही कमी असतो. त्यातच डिझेलच्या किमती भविष्यात वाढण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मी तुम्हाला पेट्रोल गाडी घेण्याचा सल्ला देईन अथवा मग सीएनजी पर्यायाचा विचारही तुम्ही करू शकता.
माझा दरमहा ३०० किमीपर्यंत प्रवास होतो. पेट्रोलवर चालणारी कोणती गाडी मला परवडेल. माझे बजेट तीन लाखांपर्यंत आहे. आपले मार्गदर्शन हवे आहे.
– डेव्हिड
तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवून ह्य़ुंडाई ईऑन ही गाडी घ्यावी. ही एक उत्तम कार असून तिचा मेन्टेनन्सचा खर्चही कमी आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गाडी उत्तम आहे.
मी आठवडय़ातून दोन-तीन दिवस कारचा वापर करतो. कार एकाच जागी जास्त दिवस राहात असेल तर काय काळजी घ्यावी. धूळ, ऊन, टायर, इंजिन यांच्या बाबतीत काय खबरदारी घ्यावी.
– डॉ. सुहास काडे
डिझेल गाडी आठवडय़ातून किमान १००-२०० किमी चालली पाहिजे. तसे केल्यास गाडीला काहीही होणार नाही. टायर दर चार वर्षांनी बदलावेत. तसेच तुमचे ड्रायव्हिंग कमी असेल तर मग तुम्ही पेट्रोलवर चालणारी गाडी घेणेच योग्य ठरेल.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com