- मला माझ्या कुटुंबासाठी कार घ्यायची आहे. माझे बजेट जास्तीत जास्त ५.३० लाख रुपयांचे आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० ते ४०० किमी राहण्याची शक्यता आहे. मी मिहद्रा केयूव्ही १००, डॅटसन रेडी गो, टाटा टियागो, टाटा बोल्ट, वॅगन आर, रेनॉ क्विड या गाडय़ांपकी कोणती घेऊ? अथवा तुम्ही कोणती अन्य गाडी सुचवू शकाल का?
- शैलेश वैद्य, अमरावती
* साडेपाच लाखांत तुम्हाला फोर्ड फिगो ही उत्तम गाडी मिळू शकते. तिला आतून स्पेसही चांगला आहे आणि मायलेजही खूप छान आहे. तसेच टाटा टियागोचे टॉप मॉडेलही तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.
- माझे बजेट नऊ लाख रुपये आहे. मला ुंदाई एलिट आय २० ही डिझेलवर चालणारी हॅचबॅक कार घ्यायची आहे. ही गाडी चांगली आहे का? किंवा दुसरी कुठली हॅचबॅक गाडी चांगली आहे का? कृपया सांगा.
– विकास गोरे, औरंगाबाद
* तुम्हाला डिझेलवर चालणारी हॅचबॅक घ्यायची असेल तर कृपया आय२० घेऊ नका. कारण तिचे सीआरडीआय इंजिन फारसे चांगले नाही. तुम्ही फोर्ड फिफो किंवा इकोस्पोर्ट घ्या अथवा पोलो किंवा मारुती ब्रिझा अथवा टाटा झेस्ट यापकी कोणतीही घ्या.
- माझ्या पालकांना ऑटो ट्रान्समिशनवाली हॅचबॅक कार घ्यायची आहे. त्यांचे मासिक ड्रायिव्हग ५०० ते ७०० किमी असेल. त्यांनी ऑटो आणि सीएनजी असे कॉम्बिनेशन घेऊ देत का. दोघेही सेवानिवृत्त आहेत.
– हृषिकेश चुंबळे
* मी तुम्हाला वॅगन आर किंवा सेलेरिओ या ऑटो ट्रान्समिशन गाडय़ा सुचवीन. कृपया सीएनजी गाडी घेऊ नका. या दोन्ही गाडय़ांच्या पेट्रोल व्हर्जनचे मायलेज २३ किमी प्रतिलिटर एवढे आहे.
- कृपया सात–आठ लाखांत चांगली ऑटो कार कोणती आहे. माझे मासिक ड्रायिव्हग १००–१५० किमी आहे. तसेच पोलो ऑटोमॅटिक जीटीएक्स, जी साडेदहा लाखांना आहे, घेणे योग्य ठरेल का?
– विनोद जावडे
* मी तुम्हाला मारुती बलेनो डेल्टा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ही गाडी सुचवीन. ती तुम्हाला ऑन रोड पावणेआठ लाखांपर्यंत मिळेल. तिच्यात सीव्हीटी सिस्टीम आहे. तुम्हाला मोठय़ा ताकदीची गाडी हवी असेल तर निस्सान मायक्रा ही गाडी घ्या. तिची किंमतही एवढीच आहे.
- माझे रोजचे अपडाऊन प्रतिदिन २०० किमी आहे. माझ्याबरोबर माझे कलिग्जही असतात. माझ्याकडे सध्या टाटा इंडिका आहे. परंतु आता मला चांगला कम्फर्ट देणारी, आरामदायी आणि टफ गाडी घ्यायची आहे. माझे बजेट सहा लाख रुपये आहे.
– के. राज
* मी तुम्हाला मारुती डिझायर झेडडीआय एएमटी ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. या गाडीचा मायलेज उत्तम आहे आणि ती पॉवरफूलही आहे. पिकअपही चांगला आहे. मारुतीच्या सेवाही चांगल्या आहेत.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com