- सर माझे बजेट ४.५ ते ५.२० लाखांपर्यंत आहे. फोर्ड फिगो पेट्रोल आणि मारुती सलेरिओ या दोन्हींमध्ये कोणती चॉइस करावी? माझे मासिक ड्रायिव्हग २०० ते ४०० किमी आहे. कधी तरी मी लाँग ड्राइव्हला जातो. ग्रामीण भागात यापकी कोणती गाडी चांगली?
– पवन कुलकर्णी, परभणी
* फोर्डचे सíव्हस सेंटर जवळ असेल तर नक्कीच फिगो घ्यावी. ही गाडी मारुतीपेक्षा दणकट आहे आणि तिचे १.२ लिटरचे इंजिन चांगले मायलेज देते आणि त्याची पॉवरही चांगली आहे. साडेपाच लाखांत उत्तम अशी ही गाडी आहे.
- माझ्याकडे वॅगन–आर गाडी असून मला सातआसनी गाडी हवी आहे. माझे बजेट ८ ते १० लाख असून ५ माणसांच्या आमच्या परिवाराचा गाडी वापर कमी– मासिक ५०० किमी. इतका आहे. होंडा बी.आर.व्ही. आणि मारुती अर्टिगा यातील कुठली गाडी घेऊ?
–के. सौरभ
* तुम्हाला खरोखर सातआसनी गाडीचा वापर करायचा असेल तरच ती घ्यावी, अन्यथा पाचआसनी गाडी घ्यावी. सातआसनी गाडीत सध्या दहा लाखांत तुम्हाला बीआरव्ही पेट्रोल किंवा रेनॉ लॉजी डिझेल या गाडय़ा मिळू शकतात. नाही तर सरळ मारुती ब्रिझा घ्यावी.
- मी एक सेकंडहॅण्ड गाडी बघितली आहे. ती १० वर्षे जुनी आल्टो ८०० असून ७०,००० किमी. चालली आहे. तिची किंमत १,३०,०००/- आहे. सदर गाडी घ्यावी किंवा कसे, याबाबत मार्गदर्शन करावे.
–हितेश वनकर
* दहा वष्रे चाललेली ही गाडी जर फारच उत्तम परिस्थितीत असेल तरच घ्यावी आणि तिची किंमत ९५ हजारांपेक्षा जास्त नसावी.
- माझे दररोज किमान २५० ते ३०० किमी ड्रायिव्हग होते. मी कोणती गाडी घ्यावी हे सुचवाल का? मला कोणती गाडी चांगला मायलेज देईल, तिचा मेन्टेनन्सही कमी हवा आणि ती दीर्घकाल टिकणारी हवी.
–विनायक कोकणे, पुणे
* तुम्ही एकटेच गाडी ड्राइव्ह करीत असाल तर मी तुम्हाला मारुती डिझायर झेडडीआय अॅटोमॅटिक ही गाडी सुचवेल. जी दहा लाखांना आहे. तसेच तिचा मायलेजही २४ किमी प्रतिलिटर एवढा आहे. शिवाय तुम्हाला गिअर बदलायचीही गरज नाही. तुम्हाला स्टर्डी गाडी हवी असेल तर फोर्ड अस्पायरचे डिझेल मॉडेल छान आहे.
- पाच ते सहा लाखांत गाडी घेण्याची माझी इच्छा आहे. माझे मासिक ड्रायिव्हग किमान ४०० किमी आहे आणि वर्षांतून किमान सहा वेळा मी लाँग ड्राइव्हला जातो. मला माझ्या बजेटात बसणारी एखादी चांगली गाडी सुचवा.
–तुषार फडतरे
* तुमचे बजेट आणि तुमच्या गरजा लक्षात घेता तुम्हाला मी वॅगन आर ऑटो ट्रान्समिशन ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. ही एक सर्वोत्तम स्मूद आणि हॅसल फ्री गाडी आहे. किमान १५ वष्रे ही गाडी तुम्ही वापरू शकाल. आतून कमी जागा आहे या गाडीत मात्र लाँग ड्राइव्हला टॉलबॉय मॉडेल चांगले आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com