बुलेट चालवणारी आमच्या गावातली मी एकमेव मुलगी. त्यामुळे माझ्याविषयी सगळ्यांनाच कुतुहल वाटायचे. मी एकदा एका मुलीला हिरो होंडा चालवताना पाहिले. तेव्हाच आपणही बाइक शिकावी, असे मला वाटायला लागले. आमच्याकडे बुलेट होती. मग मी थेट बुलेटच चालवायला शिकले. आणि तेही कोणाच्या मदतीशिवाय! मी जेव्हा प्रथम बुलेट चालवली त्यावेळी लोकांनी माझ्याकडे माना वळूनवळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. आता तर मला मैत्रिणी सैराट नावानेच हाक मारतात. बुलेट चालवण्यात जी मजा आणि आनंद आहे तो अन्य कोणत्याही गाडीत नाही. म्हणूनच मला माझी बुलेट प्राणप्रिय आहे. – योगिता भोर्डे.
या सदरासाठी माहिती पाठवा : ls.driveit@gmail.com
आणखी वाचा