मारुती सुझुकीने कॉम्पॅक्ट सदान प्रकारातील स्विफ्ट डिझायर या आपल्या कारला मंगळवारी नव्या स्वरुपात लॉन्च केले. त्याचबरोबर ‘स्विफ्ट डिजायर’ हे कारचे सध्याचे नाव बदलून केवळ ‘डिझायर’ असे नामकरण करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर १४ वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये ही कार उपलब्ध होणार आहे. नव्या कारमध्ये काही छोटे तर काही मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक महत्वपूर्ण वैशिष्ट्यांनी ही कार सज्ज असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
इंजिन – कारच्या इंजिनमध्ये कोणतेही महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत. यात स्विफ्ट डिझायरचेच इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये १.२ लीटर K सिरिजचे 4pot पेट्रोल इंजिन आहे. 82 bhp ची शक्ती आणि 113Nm चा टॉर्क असेल. तर डिझेल प्रकारातील कारमध्ये १.३ लीटरचे DDiS इंजिन देण्यात आले आहे. 74 bhp ची शक्ती आणि 190 Nm चा टॉर्क असेल. दोन्ही प्रकारात ५ स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. मॅन्युअल सोबतच विविध व्हेरिअंट्समध्ये अॅटोमॅटिक ट्रान्समिशनदेखील देण्यात आले आहे. डिझायरमधील इंजिन हे ARAI द्वारा प्रमाणीत आहे. पेट्रोल प्रकारातील कार २२ kmpl, तर डिझेल प्रकारातील कार २८.४८ kmpl माइलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
सेफ्टी फिचर्स – कारच्या विविध व्हेरिअंट्समध्ये काही प्राथमिक सेफ्टी फिचर्स पुरविण्यात आली आहेत. यात ABS ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल एअरबॅग्स, सीट बेल्ट वॉर्निंग, की लॉस वॉर्निंग, डोअर लॉक वॉर्निंगसारखी फिचर्स देण्यात आले आहेत. तर हायर व्हेरिअंटमध्ये स्पीड सेंसिंग डोअर लॉक, रिव्हर्स पार्किंग सेंसर आणि कॅमेरा, IRVM सारखे अतिरिक्त फिचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय कारमध्ये LED DRLs, LED लॅम्प्स देण्यात आले आहेत. निवडक व्हेरिअंट्समध्ये १५ इंचाचा डायमंड कट एलॉय व्हिल्स दिले आहेत.
किंमत – कारची जवळजवळ १४ व्हेरिअंट्स उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्या किंमतीतदेखील फरक आहे.
पेट्रोल व्हेरिअंट
LXi- ५.४५ लाख रुपये
VXi- ६.२९ लाख रुपये
VXi AGS- ६.७६ लाख रुपये
ZXi- ७.०५ लाख रुपये
ZXi AGS- ७.५२ लाख रुपये
ZXi+ – ७.९४ लाख रुपये
ZXi+ AGS- ८.४१ लाख रुपये
डिझेल व्हेरिअंट
LDi- ६.४५ लाख रुपये
VDi- ७.२९ लाख रुपये
VDi AGS- ७.७६ लाख रुपये
ZDi- ८.०५ लाख रुपये
ZDi AGS- ८.५२ लाख रुपये
ZDi+ – ८.९४ लाख रुपये
ZDi+ AGS- ९.४१ लाख रुपये