प्रत्येक कारनिर्माती कंपनीचे ती कार, ते मॉडेल प्रसिद्ध व्हावे हे स्वप्न असते. काहींना अशा कारवर निर्भर राहणे आवडते, तर काही परवडणाऱ्या किमतीत किंवा दिसायला चांगली अथवा जलद धावणारी, कमी खर्च देणारी कार तयार करण्यावर भर असतो. वोल्वोचा कार बनवताना सुरक्षितता हाच उद्देश असल्याचे दिसून येते. जगात कोणतीच कंपनी तिच्या इतका सुरक्षिततेवर भर देत नाही, अशी मान्यता आहे. १९५९ मध्ये कंपनीने थ्री पॉइंट सीट बेल्ट तिच्या वाहनांमध्ये देऊ केले. अशी रचना देणारी ही पहिली कंपनी होती. कंपनीने हे स्वत:पुरतेच ठेवले नाही तर त्याबाबतचे पेटंटही अन्य कंपन्यांना देऊ केले. पेडेस्ट्रियन एअरबॅग देणारीही ही पहिली कंपनी ठरली. सध्याच्या जागेवर असलेल्या एअरबॅगमुळे अपघातात हानी पोहोचण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यास सांगतो.
बरं. कंपनीचा नवा नारा काय आहे माहीत आहे? कंपनीच्या नव्या वाहनांमुळे २०२० पर्यंत एकही गंभीर अपघात होणार नाही, अशी तिच्यातील अंतर्गत सुरक्षाविषयक रचना असेल. सुरक्षिततेबाबत आपली काय कळकळ आहे हेच यातून दिसते. स्विडनच्या या कार कंपनीचा ५०० एकर जागेवर अॅस्टाझिरो हा चाचणी प्रकल्प आहे. एक छोटेसे शहरच आहे म्हणा ना. एरवी रस्त्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, वाहन अपघात, रस्त्यांवरून प्राण्यांची सैर आदी सारे येथे पाहायला मिळते व अशा ठिकाणी कंपनी तिच्या नव्या वाहनांच्या चाचण्या घेते.
वोल्वोची नवी एक्ससी९० वाहनामधील आसन रचना ही सुरक्षितता तसेच ऊर्जा संवर्धनाच्या हेतूने तयार करण्यात आली आहे. वाहनामध्ये चालकाला मार्गिकांचे मार्गदर्शन करणारी प्रणालीही यात आहे. कारच्या मागील बाजूला असलेला आरसा हा एखाद्या रडारप्रमाणे कार्य करतो. तेथे बसविण्यात आलेला कॅमेरा चालकाला मार्गदर्शन करतो. वाहन चालविताना अपघाताचा प्रसंग येण्यापूर्वीच कारमधील सीट बेल्ट आपोआपच आपल्याभोवती घट्ट होऊ लागतात. अपघात होताना वाहनाचे ब्रेक आपोआपच दाबले जातात. एखाद्या बाकाप्रसंगी मेंदू कार्यरत होत नसताना अशा गोष्टी आपोआप घडत जाऊन जीव भांडय़ात पाडण्याचे कुशल तंत्रज्ञान वोल्वोने अवगत केले आहे.
pranav.sonone@gmail.com
न्युट्रल व्ह्य़ू : जगातील सर्वात सुरक्षित कार
सध्याच्या जागेवर असलेल्या एअरबॅगमुळे अपघातात हानी पोहोचण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यास सांगतो.
Written by प्रणव सोनोने
First published on: 08-04-2016 at 01:52 IST
मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most secure car of the world