दिल्लीत नुकताच ऑटो एक्स्पो पार पडला. जागतिक दर्जाच्या या वाहन प्रदर्शनात विविध गाडय़ांचे सादरीकरण झाले. त्यातील काही यंदाच भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. फोर्डने मात्र त्यांच्या नव्या इकोस्पोर्टला त्याआधीच बाजारात आणले आहे. ऑटो एक्स्पोला सुरुवात होण्यापूर्वीच नव्या इकोस्पोर्टचे सादरीकरण झाले. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये तगडी स्पर्धा निर्माण करणाऱ्या या नव्या गाडीविषयी..
कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्पध्रेत अलीकडेच मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. मिहद्रा, मारुती, ह्युंदाई, रेनॉ या वाहननिर्मात्यांनी ग्राहकांसाठी बहुपर्याय निर्माण केले. त्यामुळेच या क्षेत्रातील स्पर्धा मोठी आहे. फोर्डच्या इकोस्पोर्टनेही ग्राहकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यश मिळवले होतेच. आता हीच इकोस्पोर्ट नव्या स्वरूपात सादर झाली आहे. तिची स्पर्धा अर्थातच मिहद्राच्या एसयूव्ही आणि रेनॉच्या डस्टरशी आहे. नव्या इकोस्पोर्टमध्ये इंजिन अधिक आधुनिक करण्यात आले आहे.
बाह्यरूप व अंतरंगात थोडे बदल करण्यात आले असले तरी नव्या फोर्ड इकोस्पोर्टचे डिझाइन हेच तिचे बलस्थान आहे.
तसेच मॅन्युअल आणि ऑटो ट्रान्समिशन अशा दोन पर्यायांत फोर्ड इकोस्पोर्ट उपलब्ध आहे. आधीच्या इकोस्पोर्टपेक्षाही अधिक आकर्षक, जास्त मायलेज देणारी, गाडीच्या आतही प्रशस्त जागेचे सुख देणारी या नव्या गडय़ाचे नवे राज्य आता सुरू झाले आहे.
बारूप
गाडीचा लूक हाच तिचा युनिक सेिलग पॉइंट (यूएसपी) असतो. नव्या इकोस्पोर्टच्या रचनाकारांनी नेमकी हीच बाब हेरत गाडीला चित्ताकर्षक रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील अप्पर बम्परला थोडासा ग्रिल कोटेड बाक देण्यात आला असून त्याला क्रोमची जोड देण्यात आली आहे. इकोस्पोर्टच्या टॉपएन्ड मॉडेलला गाडी सुरू असताना दिवसाही चालू राहणारे हेडलॅम्प्स जोडण्यात आले आहेत. बम्परच्या खाली काळ्या रंगाची जोड देण्यात आल्याने दोन्ही बाजूच्या कडा छान दिसतात. त्यामुळे गाडीचा तोंडवळा आकर्षक तर वाटतोच शिवाय त्याला क्रोम फॉग लॅम्प्सचीही जोड देण्यात आली आहे. खिडक्यांच्या फ्रेम्स सुबकरीत्या तयार करण्यात आल्या असून िवग मिर्स ड्रायव्हर व सह-प्रवासी अशा दोन्ही बाजूला देण्यात आले आहेत. गाडीचा मागील भागही तेवढाच देखणा आहे. गाडीच्या मागच्या दाराला एक जादा टायर (आधीच्या व्हर्जनप्रमाणेच) देण्यात आले आहे. रूफ रेल्सची सुविधा असली तरी ते सक्रिय नाहीत. मात्र त्यामुळे गाडीला स्पोर्टी लूक आला आहे.
इन्फोटेन्मेंट सुविधा
गाडीत सिंक अॅपिलक विथ व्हॉइस कमांड ही सुविधा आहे. शिवाय साडेतीन इंचाचा एमएफडी स्क्रीनही डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. याव्यतिरितक्त एफएम व एएम रेडिओ, ऑक्झ-इन सुविधा, यूएसबी पोर्ट, सीडी/एमपीथ्री प्लेअर आदी नेहमीच्या सुविधाही आहेतच. शिवाय बोनेट प्रोटेक्टर, हेडलॅम्प कव्हर, स्पेअर व्हील कव्हर, रिव्हर्स पाìकग सेन्सर्स, मड फ्लॅप्स, साइड रिनग बोर्ड, कार कव्हर या अॅक्सेसरिजही गाडीबरोबर देण्यात येतात.
अंतरंग
गाडीच्या आतमध्ये गडद रंगांची थीम वापरण्यात आली आहे. डॅशबोर्डवर गडद रंग आणि क्रोम यांची सांगड घालण्यात आली आहे. सीट्सना फॅब्रिक अपहोल्स्ट्रीचे आवरण देण्यात आले असून स्टीअिरग व्हीलला चामडय़ाचे आवरण देण्यात आले आहे. तसेच गीअर शिफ्ट नॉब आणि हँड ब्रेक यांनाही लेदरचा मुलामा देण्यात आला आहे.
डॅशबोर्डाच्या मध्यभागी बटनांची मांदियाळी असून त्यावर एसीच्या जाळ्या, डायल्स आणि टचस्क्रीनची सुविधा आहे. एसीच्या जाळ्या पुढील बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांतही देण्यात आल्या असून त्यांची बटने स्टीअिरग व्हीलच्या मागील बाजूस आहेत.
गाडीची मागील सीट पूर्णत फोल्ड करून गाडीत अधिक जागा तयार करते येते. तुमच्याकडे जास्तीचे सामान असेल तर ही सोय फायद्याची ठरते. याशिवाय मागच्या सीटला ६०-४० प्रमाणात फोल्ड करून त्यावर आरामात टेकता येऊ शकेल अशीही व्यवस्था आहे. चालकाची सीट उंचीनुसार कमी-जास्त करता येऊ शकते. याव्यतिरिक्त कपहोल्डर्स, मधल्या जागेत एसी व्हेंट्स, प्रशस्त लेगरूम व हेडरूम या सुविधाही आहेतच.
आणखी काही वैशिष्टय़े
गाडीच्या मागील बाजूची काच पुसण्यासाठी वायपर्स आहेत. तसेच आत केबिनमध्ये ड्रायव्हरच्या सीटला आर्मरेस्टची सुविधा देण्यात आली आहे. काढून ठेवता येण्याजोगा किंवा जागेनुसार अॅडजस्ट करता येऊ शकणाऱ्या रिअर पॅकेज ट्रेची व्यवस्थाही गाडीत आहे. प्रवाशाच्या सीटखाली स्टोअरेज करण्यासाठी जागा आहे. याव्यतिरिक्त सनग्लास होल्डर, इल्युमिनेटेड पॅसेंजर व्हॅनिटी मिरर, रात्रंदिन इनर-रिअर व्ह्यू मिरर व उंचीनुसार कमी-जास्त करता येऊ शकणाऱ्या सीट्स ही काही इतर वैशिष्टय़े नव्या फोर्ड इकोस्पोर्टची आहेत.
इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि ट्रान्समिशन
नवी इकोस्पोर्ट दोन पेट्रोल आणि एक डिझेल अशा तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंट्स 1.5 लिटर टीआय-व्हीसीटी आणि फोर्डच्या जगप्रसिद्ध 1.0 लिटर इकोबूस्ट या दोन पर्यायांत आहेत. डिझेलवर चालणारी इकोस्पोर्टचे इंजिन 100 पीएसचे असून 1.5 लिटर सििलडर क्षमता आहे. फाइव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व सहा स्पीड ऑटो बॉक्स असे दोन ट्रान्समिशन पर्याय इकोस्पोर्टमध्ये उपलब्ध आहेत.
मायलेज
गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स २०० मिमीचा असल्याने गतिरोधकावर गाडी आपटण्याची भीती नाही. शिवाय कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर गाडी आरामात धावू शकते. १.५ लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हर्जनची इकोस्पोर्ट १५.८५ किमी प्रतिलिटरचा मायलेज देते, तर ऑटोमॅटिक व्हर्जनला हाय मायलेज १५.६० किमी प्रतिलिटर एवढा आहे. १.० लिटर इकोबूस्ट इंजिन १८.८८ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते, तर डिझेलवर चालणारी नवी इकोस्पोर्ट एक लिटर डिझेलमध्ये २२.७ किमीचा प्रवास घडवते.
सुरक्षा
गाडीत अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, एअरबॅग्ज, साइडबॅग्ज व कर्टनबॅग्ज आदी सुरक्षाव्यवस्था आहेत. इमर्सन्सी असिस्ट, रिमोट कंट्रोल्ड सेंट्रल लॉकिंग फ्लिप की, स्पीड अलार्म इन फ्युल कम्पुटर आदी नव्या सुविधाही आहेत.
स्पर्धा कोणाशी..
फोर्ड इकोस्पोर्टची थेट स्पर्धा आहे ती कॉम्पॅक्ट एसयूव्हीतील गाडय़ांशी. त्यात मिहद्राच्या टीयूव्ही३०० या गाडीचा समावेश आहे. ह्युंदायी क्रेटा, मारुतीची एस-क्रॉस व रेनॉची डस्टर या गाडय़ाही इकोस्पोर्टच्या स्पर्धक आहेत.
किंमत : साडेसहा लाखांपासून पुढे..
– समीर ओक ls.driveit@gmail.com