सहसा ऑफ रोड ड्रायिव्हगसाठी जंगल, डोंगरदऱ्या, दलदलीचा प्रदेश अशा ठिकाणी जावे लागते, या सर्व ठिकाणी चालू शकणाऱ्या, टिकू शकणाऱ्या मजबूत बांध्याच्या गाडय़ा दिमतीला असाव्या लागतात.. तरच ऑफ रोडचा थरार खऱ्या अर्थाने अनुभवता येतो. मात्र, हा अनुभव घेता आला चक्क मुंबईत आणि तोही पोर्शसह!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तीव्र चढ, तीव्र उतार, पुढे लगेच स्पीड ब्रेकर्स, रम्बलर्स, चिखल, पुन्हा छोटय़ा छोटय़ा टेकडय़ा.. हा सर्व जामानिमा होता वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीच्या एमएमआरडीए मदानात. ऑफ रोडचा थरार मुंबईत अनुभवता यावा यासाठी ही रचना करण्यात आली होती आणि याला निमित्त होते पोर्श.. होय, पोर्शच.. अनेकांची ड्रीम कार असलेली पोर्श.. कयान आणि मकान या दोन एसयूव्हींच्या ऑफ रोड ड्रायिव्हगचा अनुभव घेण्यासाठी पोर्शतर्फे बीकेसीच्या एमएमआरडीए मदानावर ऑफ रोड ट्रॅकची बांधणी करण्यात आली होती. या ट्रॅकवरून कयान आणि मकान या एसयूव्ही चालवून ऑफ रोड ड्रायिव्हगचा लिमिटेड अनुभव घ्यायचा होता.
सुरुवातीला अॅक्सिलरेशन पॉइंट होता. विमान धावपट्टीवर येण्याआधी जसे रांग लावत टारमॅकवर येऊन थांबते तशी आमची कयान या अॅक्सिलरेशन पॉइंटवर आली. तेथून इन्स्ट्रक्टरने इशारा करताच कयानच्या अॅक्सिलरेटरवर पाय ठेवताच अवघ्या काही सेकंदातच गाडीने वेग घेतला. थोडे पुढे गेल्यावर एका विशिष्ट ठिकाणी अॅक्सिलरेशन कमी करून गाडी थांबवायची आणि पुढे एका तीव्र चढावर गाडी चढवायची होती. याला इन्क्लायिनग असे म्हणतात. या ठिकाणी गाडी ऑफ रोड मोडला टाकायची. हा तीव्र चढ चढताना गाडी कुठेही मागेपुढे होत नाही की तुम्हाला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. एका संथ लयीत गाडी चढ चढते. गाडी थांबलीच तर फक्त अॅक्सिलरेटरवर हलकेच दाब द्यावा लागतो. तीव्र चढानंतर तेवढाच तीव्र उतार व त्यानंतर स्पीड ब्रेकर्स पार करून कयान पुढच्या वळणावर आली. आता या ठिकाणी गाडी अगदी तुमच्या डाव्या बाजूला झुकेल अशा प्रकारच्या टेकडीच्या बाजूने गाडी पुढे काढायची होती. तेथून पुढे खरा थरार होता.
तीव्र चढाव आणि स्पीड ब्रेकर व रम्बलर्स हे अडथळे पार केले की होता एक तीव्र उतार. या उताराकडे पाहूनच धस्स होत होते. संथ लयीत जाणारी कयान या तीव्र उतारावरून आरामात गेली. त्यानंतर होता तीव्र चढ. हा चढ पार केल्यावर लगेचच एक तीव्र वळण होते. या वळणावर गाडी तुम्हाला रेस न करता तुमच्या स्टीअिरगवर नियंत्रण ठेवून पुढे काढायचे कौशल्य दाखवावे लागते. तसे करून पुढे गेल्यानंतर पुन्हा एक छोटासा चढ आणि त्यानंतर एक भलामोठा खड्डा. या खड्डय़ातून जाताना गाडी पूर्णत: टिल्ट होते. ड्रायव्हरकडील बाजू पूर्णत: झुकेल अशा रीतीने या खड्डय़ाची रचना करण्यात आलेली होती. हा खड्डा पार केल्यानंतर पुन्हा एक छोटासा खड्डा पार करावा लागला. तेथून पुढे गुडघाभर चिखल पसरवण्यात आला होता. या चिखलातून गाडी रेस करायची. म्हणजे सगळा चिखल बोनेट आणि सर्व दारांवर उडतो. फोर व्हील ड्राइव्ह असल्याने गाडी या चिखलातून पुढे गेली खरी. मात्र, चिखलात गाडीचे चाक रुतल्यानंतर जी कसरत करावी लागते, म्हणजे अॅक्सिलरेटर जोरात दाबून रुतलेले चाक बाहेर काढणे वगरे, ती हलक्याशा स्वरूपात करावी लागली. चिखलातून बाहेर पडण्याचे दिव्य पार केल्यावर समोर दिसत होता एंड पॉइंट. मात्र, या एंड पॉइंटवर पोहोचण्याआधी आणखी छोटय़ा छोटय़ा टेकडय़ांचा अडथळा पार करावा लागणार होता. तो पार करताना मात्र थोडी कसरत करावी लागली. कारण चिखलाने माखल्यामुळे टायर स्लिपरी झाले होते. या टेकडय़ांवरून गाडी बाहेर काढण्यासाठी सारखी रेस करावी लागत होती. एका क्षणी तर गाडीचे एक चाक हवेत व तीन चाके जमिनीवर अशी परिस्थिती होती. थोडा जोर लावल्यावर गाडी अखेरीस एंड पॉइंटला पोहोचली आणि एका लिमिटेड थराराची इतिश्री झाली.
खरं तर हा अनुभव घेताना पोटात गोळाच यावा. सुरुवातीला तो आलाच. मात्र पोर्शचे स्टीअिरग हातात आल्यावर जो आत्मविश्वास निर्माण होतो, तो शब्दातीत आहे. सुरुवातीच्या नव्र्हसनेसनंतर हा ऑफ रोडचा थरार पुन:पुन्हा अनुभवावासा वाटत होता. कयान आणि मकान या दोन्ही एसयूव्हींची ही जादू आहे.
तुम्हाला फारसे कष्ट घ्यावेच लागत नाहीत. स्टीअिरग हातात ठेवणे आणि योग्य वेळी अॅक्सिलरेटर व ब्रेकवर पाय ठेवणे वा काढणे या दोनच बाबी तुम्हाला करायच्या असतात. ऑफ रोड मोडला असल्यानंतर गाडी २० किमी प्रतितास एवढय़ाच वेगाने पुढे जात असते. याशिवाय गाडीच्या आतील अॅम्बिअन्स वर्णनातीत आहे. ऑफ रोड मोडला गाडीची बॉडी थोडी वर उचलली जाते, हे विशेष.
गाडय़ांविषयी थोडेसे..
कयान जीटीएस
- इंजिन टाइप – फ्रण्ट
- सििलडर्सची संख्या – सहा
- इंधन प्रकार – पेट्रोल आणि डिझेल
- ट्रान्समिशन – ८ स्पीड ट्रिप्टॉनिक
- टॉप स्पीड (किमी/ प्रतितास) – २२१
- ग्राऊंड क्लिअरन्स – २६८ मिमी
- किंमत – डिझेल व्हर्जन – ९९ लाख ३२ हजार (एक्स शोरूम, मुंबई), पेट्रोल व्हर्जन – एक कोटी ४१ लाख ७६ हजार (एक्स शोरूम, मुंबई)
मकान टबरे
- इंजिन टाइप – फ्रण्ट
- सििलडर्सची संख्या – सहा
- इंधन प्रकार – पेट्रोल
- ट्रान्समिशन – ८ स्पीड
- टॉप स्पीड (किमी/ प्रतितास) – २६६
- ग्राऊंड क्लिअरन्स – २३० मिमी
- किंमत – डिझेल व्हर्जन – एक कोटी १६ लाख २९ हजार (एक्स शोरूम, मुंबई)
– विनय उपासनी
vinay.upasani@expressindia.com